Weight Drought : ओला दुष्काळ जाहीर करून बळीराजाला मदत करावी

आदित्य ठाकरे यांची मागणी : सिन्नर तालुक्यात पीक नुकसानीची पाहणी
 Weight Drought
Weight DroughtAgrowon

सिन्नर, जि. नाशिक : यंदा संपूर्ण राज्यभर पावसाने सरासरी ओलांडली आहे. अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) बळीराजा संकटात असून सरकारने राज्यात ओला दुष्काळ (Weight Drought) जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आवश्यक ती मदत करण्याची गरज आहे; मात्र, सरकारकडून याबाबतीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे, असा आरोप शिवसेनेचे युवा नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackrey) यांनी केला.

 Weight Drought
Wet Drought : ओल्या दुष्काळाचे कोरडे वास्तव

आदित्य ठाकरे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सचिन आहीर यांच्यासमवेत गुरुवारी (ता. २७) सिन्नर तालुक्यातील सोनारी येथे अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उदय सांगळे, भारत कोकाटे, दीपक खुळे, नीलेश केदार, अरुण वाघ आदी उपस्थित होते.

 Weight Drought
Wet Drought : 'ओल्या दुष्काळा’ च्या ऑनलाइन आंदोलनाला उदंड प्रतिसाद

राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे बघायला सत्ताधाऱ्यांकडे वेळ नाही. अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करून दिलासा देण्याची गरज आहे. सरकार शेतकऱ्यांना मदत करणार असेल तर विरोधक म्हणून आम्हीदेखील सरकारच्या सोबत राहू; मात्र, खोके बहाद्दरांकडून शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता नाही, असा टोला ठाकरे यांनी लगावला. शेतकऱ्याचे होणारे नुकसान भरून निघणार नाही; मात्र सरकारकडून दिलासा देणारे शब्दही ऐकायला मिळत नाहीत, ही शोकांतिका असल्याचे ठाकरे म्हणाले. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम दर्जाहीन आहे. या कामात कोणाकोणाचे खिसे गरम झाले ते नाव घेऊन सांगण्याची गरज नाही. समृद्धीमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले. समृद्धी लगतच्या शेतांमध्ये पावसाचे पाणी शिरले, त्याबाबत सरकारला देणेघेणे नाही, असा आरोप करण्यात आला.कृषिमंत्री शेतकऱ्यांची अवहेलना करतात...

 Weight Drought
Wet Drought : हा ओला दुष्काळच !

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. सरकारकडून केवळ मदतीची घोषणा झाली. शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले हे सर्वजण जाणून आहेत. शेतकऱ्याची समस्या जाणून घ्यायची असेल तर प्रत्यक्ष बांधावर जाण्याची गरज आहे; मात्र राज्याला लाभलेले कृषिमंत्री शेतकऱ्यांची अवहेलना करतात मुख्यमंत्री नेमके कोण, हेदेखील समजत नाही. त्यामुळे शेतकरी सैरभैर झाला असून या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पुढे आली आहे. सद्यःस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकत नसल्याची खंत ठाकरे यांनी व्यक्त केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com