MSEDCL News : महावितरणचा भोंगळ कारभार; सुदैवाने शेतकरी बचावला

नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने जीवितहानी टळली. या प्रकारास महावितरणचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
Electric Accident
Electric Accident Agrowon

नाशिक ः सटाणा तालुक्यातील द्याने येथील शेतकरी महेंद्र धर्मा कापडणीस हे कांद्याला (Onion) पाणी भरत असताना वीजप्रवाह सुरू (Electricity Supply) असणारी वीजवाहिनीची तार (Electric Taar) तुटून पडली.

नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने जीवितहानी टळली. या प्रकारास महावितरणचा (Mahavitaran) भोंगळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचन करताना भारनियमन, कमी दाबाने वीजपुरवठा (Electric Power Supply) असे विषय अडचणीचे ठरत आहे.

अशातच अनेक ठिकाणी रोहित्र नादुरुस्त असल्याने त्याचा मनस्ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

अशी परिस्थिती असताना काही ठिकाणी विद्युत तारा लोंबकळत असल्याने शेतकरी जोखीम घेऊन शेतात काम करत असल्याची परिस्थिती आहे.

त्यामुळे विजेच्या तारेखाली असणारी शेती करायची की नाही असा प्रश्न पडला आहे.

यापूर्वी भूषण कापडणीस, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र कापडणीस यांनी नामपूर महावितरणचे मुख्य अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

मात्र त्यांनी लेखी अर्ज स्वीकारण्यास नकार दिला.काही नुकसान झाल्यास पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून देईल असे तोंडी आश्वासन दिले होते,असे कापडणीस यांनी सांगितले.

Electric Accident
Ginning Industry : सतत खंडित होणारा वीजपुरवठा वाढवतोय उत्पादन खर्च
वीजपुरवठा करताना अशी दुर्घटना घडू नयेत यासाठी नेहमी प्रयत्न असतो. द्याने येथे कर्मचारी नसल्याने कामात काही अडचणी होत्या. मात्र शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यास प्राधान्याने दोन दिवसांत लोंबकळलेल्या तारा दुरुस्त करण्यात येतील.
नितीन सूर्यवंशी, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, नामपूर उपविभाग

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com