जालन्यातील नुकसानग्रस्तांचा औरंगाबादमध्ये ठिय्या

जालना जिल्ह्यातील मंठा व परतूर तालुक्यातील प्रकल्पामुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे.
जालन्यातील नुकसानग्रस्तांचा औरंगाबादमध्ये ठिय्या
Farmer ProtestAgrowon

औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील मंठा व परतूर तालुक्यातील प्रकल्पामुळे शेती पिकांचे नुकसान (Crop Damage) होत आहे. अशा शंभरावर शेतकऱ्यांनी आपल्या भूसंपादन (Land Acquisition), मोबदला, नुकसान भरपाईच्या (Compensation) प्रश्नावर पुन्हा एकदा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर बुधवारी (ता.२) ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

आंदोलकांच्या माहितीनुसार, निम्न दुधना प्रकल्पाच्या जलाशयातील पाणीसाठ्यामुळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातील असंपादित शेतीमध्ये २०१६ ते २०२० पर्यंत आणि २०२१ पासून सतत पाणी आले. त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. प्रकल्पासाठी संपादित न केलेल्या मात्र प्रकल्पाच्या पाण्यामुळे कायम बुडीत राहणाऱ्या शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

परतूर तालुक्यातील वैजोरा, श्रीधर जवळा, रोहीना, नागापूर, रोहीना बु, तर मंठा तालुक्यातील हातवन, मंगरूळ, विडोळी, वांजोळा, नान्सी आदी गावांतील शेतकऱ्यांचा नुकसानग्रस्तांमध्ये समावेश आहे. या संदर्भात या आधीही तीन ते चार वेळा आंदोलन केल्यानंतर केवळ आश्वासन देऊन गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या प्रशासनाने शेतकऱ्यांची बोळवण केली. आता मात्र जोवर निर्णय होत नाही तो पर्यंत माघार न घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

दिवसभर शेतकरी कार्यालयासमोर ठिय्या देऊन होते. मात्र प्रशासनाने सायंकाळपर्यंत त्यांच्याशी चर्चा करण्याचे औदार्य दाखवले नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या आंदोलनात शेतकरी दीपक काकडे, रयत क्रांती संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष गजानन राजबिंडे, एच. पी. निर्वळ, गणेश गायवळ, नवनाथ राजबिंडे, श्‍याम बागल, शंकरराव ठाकूर, अविनाश राजबिंडे, संपत खरात यांच्यासह शंभरावर शेतकरी सहभागी होते. सायंकाळपर्यंत शेतकऱ्यांची न्याय मागण्यासंदर्भात घोषणाबाजी सुरू होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com