हवामान केंद्राच्या आकडेवारीमुळे शेतकरी संभ्रमात

जिल्ह्यातील अकोलखेड महसूल मंडळात जून, जुलै या दोन महिन्यांत पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असतानाही हवामान केंद्रातर्फे चुकीची आकडेवारी दिली जात असल्याचा आरोप या भागातील संत्रा उत्पादकांनी केला आहे.
Weather
WeatherAgrowon

जिल्ह्यातील अकोलखेड महसूल मंडळात जून, जुलै या दोन महिन्यांत पावसाच्या खंडामुळे (Delay In Rain) शेतकऱ्यांचे नुकसान (Farmer's Loss) झालेले असतानाही हवामान केंद्रातर्फे चुकीची आकडेवारी (Wrong Data By Weather Department) दिली जात असल्याचा आरोप या भागातील संत्रा उत्पादकांनी (Orange Farmer) केला आहे.

Weather
हवामान अंदाजानूसार पिक व्यवस्थापन कसे करावे?

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांमार्फत याबाबत शासनाकडे निवेदन पाठवले. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, अकोलखेड महसूल मंडळात यावर्षी संत्रा पिकाच्या मृग बहराचा फळपीक विमा एचडीएफसी कंपनीकडे काढला आहे. १५ जून ते १५ जुलै या काळात १२५ मिलिमीटर पाऊस न झाल्यास हेक्टरी ४० हजार रुपये क्लेम लागू राहील, असे सांगितले आहे. मात्र, या महसूल मंडळामध्ये सदर कालावधीत पेरणीलायकसुद्धा पाऊस झाला नव्हता.

Weather
Crop Damage: सर्वाधिक वसमत, कळमनुरी तालुक्यात पीक नुकसान

एकाही नदी नाल्याला त्या काळात पूर गेला नाही. त्यामुळे काही जणांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. संत्रा बागांना कमी पावसामुळे मृग बहार फुटला नाही. दुसरीकडे पावसाची नोंद घेणाऱ्या केंद्राच्या अहवानुसार १५ जुन ते १४ जुलै पर्यंत सुमारे ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस दाखवण्यात आला आहे. हा प्रकार शेतकऱ्यांची खिल्ली उडविणारा आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत पुणे येथून स्कायमेट वेदर स्टेशनची पाहणी करण्यासाठी अधिकारी तसेच कृषी विभागाचे अधिकारी आले होते. ते आता काय अहवाल देतात याकडे लक्ष लागले आहे.

पाऊस नोंदीसाठी उभारलेल्या स्टेशनचे केबल बऱ्याच दिवसांपासून निर्जीव असल्यामुळे खंडित झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. मीटर रीडिंगही बंद अवस्थेत दिसून येते. असे असताना नोंदी कुठल्या आधारावर झाल्या, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com