Agrowon Exhibition : नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना भुरळ

आधुनिक शेतीतील प्रयोग, पीकसंरक्षण, करार शेती, नियंत्रित शेती यासह विविध नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची भुरळ शेतकऱ्यांना पडली.
Agrowon Exhibition
Agrowon ExhibitionAgrowon

औरंगाबाद ः सकाळ-अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला (Agrowon Exhibition) सोमवारी (ता. १६) शेवटच्या दिवशीही शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. आधुनिक शेतीतील (Agriculture Experiment) प्रयोग, पीकसंरक्षण (Crop Protection), करार शेती, नियंत्रित शेती यासह विविध नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची भुरळ शेतकऱ्यांना पडली. या तंत्रज्ञानासाठी (Agriculture Technology) दिवसभर शेतकऱ्यांची रीघ कायम राहिली.

अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित पीक पद्धती कशी घ्यावी, याविषयी माहिती मिळाली. यांत्रिकीकरणाच्या बाबतीत आधुनिक पद्धतीने बनविण्यात आलेली बहुउपयोगी अवजारे पाहायला मिळाली. त्याशिवाय चर्चासत्रांमधूनही शेतकऱ्यांना विविध पीक पद्धतीचे ज्ञान आत्मसात झाले. माझा अनुभव खूपच चांगला आहे.

- दगडू यादवराव मुळे, रा. कडेठाण, ता. पैठण, जिल्हा औरंगाबाद.

कृषी प्रदर्शनामध्ये नवीन तंत्रज्ञानासोबतच खते, बियाणे, लागवडीची पद्धत याविषयी सविस्तर माहिती मिळाली. कृषी अवजारांमध्ये उपलब्ध झालेले प्रगत तंत्रज्ञान या ठिकाणी पाहायला मिळते. एकूणच शेतकऱ्यांसाठी हे कृषी प्रदर्शन पर्वणी ठरले. दरवर्षी औरंगाबादसारख्या ठिकाणी असे प्रदर्शन झाले, तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होईल.

- बाळकृष्ण रखमाजी हुके, रा. वजीरखेडा, ता. भोकरदन, जिल्हा जालना.

Agrowon Exhibition
Agrowon Exhibition : यंत्रशक्तीच्या दालनांमध्ये लाखोंची उलाढाल

प्रदर्शनामध्ये सेंद्रिय खतांची माहिती उपयुक्त वाटली. या ठिकाणी आधुनिक पद्धतीची अवजारेही पाहायला मिळाली. कृषिप्रक्रिया उद्योग, विविध कंपन्यांची खते-बियाणांची दालने माहितीपूर्ण होती. या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी माहितीचा खजिना उपलब्ध झाला, असाच उपक्रम दरवर्षी झाला, तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल.

- रामकृष्ण येडोबा सुस्ते, रा. जरंड, तालुका सोयगाव, जिल्हा औरंगाबाद.

अॅग्रोवनच्या या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त साधने पाहायला मिळाली. आम्ही वर्षानुवर्षे चिकट, कामगंध सापळे वापरून किडीचे एकात्मिक व्यवस्थापन करीत असतो. शेतीत वन्यजीवांचा त्रास कमी करण्यासाठी झटका कुंपणाचा चांगला पर्याय या ठिकाणी बघितला. शेतीसाठी उपयुक्त साधने दिसून आली.

- श्रीराम प्रकाश दौड, रा. जडगाव सपकाळ, ता. भोकरदन, जि. जालना

Agrowon Exhibition
Agrowon Exhibition : शेतकरी कंपन्यांच्या उत्पादनांना ग्राहकांची पसंती

माझी २५ एकर बागायती शेती आहे. तरुणांना आधुनिक शेती करायची आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन देणारे हे प्रदर्शन आहे. नवी यंत्रे, अवजारे, डिजिटल तंत्रज्ञानाची सहज सोप्या भाषेत मला येथे माहिती मिळाली. उत्तम तंत्रज्ञानाच्याशिवाय शेती नफेशीर होणार नाही, हे आम्ही शेतकऱ्यांनी मान्य केले आहे. पण, त्यासाठी नेमके काय करायचे हे मला प्रदर्शनातून कळले.

- उमेश रामजी आवारे पाटील, मु.पो.धांदलगाव, ता.वैजापूर, जि. औरंगाबाद

शेतीमधील निविष्ठांच्या नव्या उत्पादनांची माहिती या प्रदर्शनात मिळाल्याने मला आनंद झाला. मी कमी जमीन असतानाही उत्तम कापूस शेती करण्याचा प्रयत्न करतो. या प्रदर्शनात मला नव्या कापूस बियाण्यांची माहिती मिळाली. कमी कीडरोग व जास्त उत्तम असे या बियाण्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे माझ्या कापूस शेतीला या प्रदर्शनामुळे योग्य दिशा मिळणार आहे.

- काशिनाथ घनश्याम गावंडे, मु.पो. आव्हाना, ता. भोकरदन, जि. जालना

आमच्या गावातील शेतकरी उत्पादक कंपनीचा मालदेखील या प्रदर्शनात भरपूर विकला गेला. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती हवी आहे आणि ग्राहकांना सेंद्रिय माल हवा आहे. ग्राहक आणि शेतकरी अशा दोन्ही घटकांची काळजी ‘अॅग्रोवन’च्या प्रदर्शनामुळे घेतली गेली. त्यामुळे पुढील प्रदर्शनात सेंद्रिय शेतमालासाठी जास्त संधी द्यावी.

- अंबादास पुंडलिक सोमासे, मुक्काम पेंडगाव, पोष्ट चारनेर, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद

सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासह शेतीतील मजूर प्रश्नाचा पर्याय शोधण्यासाठी ॲग्रोवन कृषी प्रदर्शनात आलोय. अनेक पर्याय मला इथे दिसत आहे. अनेक दिवसांपासून उत्सुकता होती आज प्रदर्शनात सहभागी झालो. इतरही शेती पद्धतीची माहिती मला प्रदर्शनात आल्यामुळे झाली.

- कल्याण शिंदे, नेकनूर जि. बीड

उसासह इतर पिकाच्या शेतीसोबतच मधमाशी पालनाचा पर्याय व सविस्तर माहिती घेण्यासाठी ॲग्रोवन कृषी प्रदर्शनात आलो. इथे आल्यानंतर मधमाशीचं गाव पाहून अनेक प्रश्नांची उत्तरे मला मिळाली. मी लवकरच आता या पूरक उद्योगाचा विचार करणार आहे.

- बाबूराव अडसूळ, कळंब, जि. उस्मानाबाद

मी सध्या कंपनीत नोकरी करतो, सोबत व्यवसायही करतो. माझा भाऊ बारा एकर शेती करतो. त्याला शेतीत काय नवीन देता येईल, हे पाहण्यासाठी ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनात आलो. उसासह पाचट कुजवण्यासाठी काय करता येईल. खोडवा उसाच्या मुळ्या तोडण्यासाठी नवीन यंत्र कोणते परिणामकारक वापरता येईल. याचा शोध घेण्यासाठी आलोय ते मला इथे दिसले.

- दयानंद भिसे, पिंपरी आंबा, ता. जि. लातूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com