
फलटण, जि. सातारा : सृष्टिचक्रात शेतकरी (Farmer) महत्त्वाचा घटक आहे. सुदृढ जीवनमान प्रत्येकाला मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे (Organic Farming) वळावे. सेंद्रिय अन्नधान्य, भाजीपाला आणि फळपिकांचे उत्पादन घ्यावे असे आवाहन के. बी. बायो ऑरगॅनिकचे संचालक सचिन यादव यांनी येथे केले.
सेंद्रिय शेती व खतांचा योग्य वापर’ या विषयावर शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण के. बी. बायो ऑरगॅनिककडून आयोजित केले होते. या वेळी श्री. यादव बोलत होते. ते म्हणाले, ‘‘सर्वप्रथम शेतकऱ्यांनी कोणत्याही पिकाचे उत्पादन घेण्यापूर्वी माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करणे गरजेचे आहे. याशिवाय कोणत्या पिकाचे उत्पादन घ्यायचे याविषयीचे चोख नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान, मार्केटिंग यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे.’’
‘‘सेंद्रिय खतांचा योग्य वापर, कीड व रोग नियंत्रण, विविध जैविक निविष्ठांची माहिती कंपनीकडून दिली. मी, शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेती व शेतीपूरक व्यवसाय हा शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. यामुळे यापुढेही सामाजिक बांधिलकी जपत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचा उपक्रम सुरू ठेवणार आहे,’’ अशी माहिती श्री. यादव यांनी दिली.
या वेळी योगेश यादव, हेमंत खलाटे, गणेश निकम, नितीन धायगुडे, लक्ष्मण पाटील, डॉ. विशाल केंद्रे, महेश आगम, ऋतुजा पवार, प्रवीण शिंदे, राजेंद्र घाडगे, अंकुश भांडवलकर, नवनाथ पवार उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेश यादव यांनी केले, तर आभार नितीन धायगुडे यांनी मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.