‘हर घर तिरंगा’ अभियानात शेतकऱ्यांचा सहभाग नाही

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य व केंद्र शासनाने ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा अभियान’ राबविण्याचे आवाहन केले आहे.
Independence Day
Independence DayAgrowon

पुणे ः ‘हर घर तिरंगा’ अभियानात (Har Ghar Tiranga Campaign) शेतकरी सहभागी होणार नाहीत. त्याऐवजी अजूनही शेतकऱ्यांना पारतंत्र्यात ठेवणाऱ्या समस्या हटविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्याची मोहीम राबवली जाईल, असे स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanwat) यांनी म्हटले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य व केंद्र शासनाने ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा अभियान’ राबविण्याचे आवाहन केले आहे. ‘‘स्वातंत्र्य प्राप्तीला ७५ वर्षे झाल्याने देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. शेतकरी मात्र पारतंत्र्यातच आहेत. देशात शेतकऱ्यांचे फक्त शोषण झाले व शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. Soybean

Independence Day
Cotton : कापूस आयातदारांपुढे आयसीए नमेल का?

शेतीमालाचे भाव जाणीवपूर्वक पाडण्याचे कारस्थान सतत सुरू आहे. त्यासाठी निर्यातबंदी, साठ्यांवर मर्यादा, अनावश्यक आयाती, सारखी हत्यारे वापरली जात आहेत. शेतकऱ्यांचे भूमिहक्क संकुचित केले जात आहेत. अन्यायाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याससुद्धा बंदी आहे. त्यामुळे हे कसले स्वातंत्र्य,’’ असा सवाल घनवट यांनी उपस्थित केला आहे.

Independence Day
देशात Soybean Sowing अधिक असल्याचा SOPA चा दावा|Soybean Market|Agrowon | ॲग्रोवन

‘इंडिया’कडून ‘भारतीय’ शेतकऱ्यांचे शोषण होते आहे. त्याचा परिणाम लाखो शेतकरी आत्महत्या आहेत. गरिबी, बेरोजगारी असलेला देश आर्थिक संकटात लोटला जात आहे. अशा परिस्थितीत न मिळालेल्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यात भारतातील शेतकऱ्यांना रस नाही. बलिदानाअंती मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल शेतकऱ्यांना अभिमान आहे. १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन शेतकरी साजरा करतील; पण ७५ वर्षे होऊनही कृषिप्रधान भारतातील शेतकऱ्यांपर्यंत खरे स्वातंत्र्य पोहोचलेच नाही याची खंत आहे.

आजही शेतकऱ्यांना व्यवसायाचे स्वातंत्र्य नाही, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य नाही, जमीन किंवा व्यवसायाच्या विस्ताराचे स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्यप्राप्ती नंतरही शेतकऱ्याचे मरण हे सरकारचे धोरण राहिले आहे. सरकारच्या हे लक्षात आणून देण्यासाठी जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवावीत, असे आवाहन घनवट यांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com