शेतकऱ्यांचे लक्ष नुकसानाच्या पंचनाम्यांकडे

गेल्या २४ तासांत या भागातील पावसाचा जोर ओसरला आहे. पाऊस नसल्याने नदी-नाल्यांचे पूरही कमी झाले आहेत. पाऊस व पुराच्या पाण्यामुळे मात्र नुकसान प्रचंड झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

अकोला ः गेल्या २४ तासांत या भागातील पावसाचा जोर (Heavy Rain In Akola) ओसरला आहे. पाऊस नसल्याने नदी-नाल्यांचे पूरही (Akola Flood) कमी झाले आहेत. पाऊस व पुराच्या पाण्यामुळे मात्र नुकसान (Crop Damage) प्रचंड झाले आहे. सखल भागातील पिके तीन ते चार दिवस सलग पाण्यात असल्याने, तर काही ठिकाणी पिके खरडून गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हंगामात लागवड (Kharif Crop Cultivation) झालेल्या क्षेत्रापैकी सुमारे २५ टक्के पिकांना या आपत्तीचा (Natural Calamity) फटका बसला आहे. या नुकसानीचे पंचनामे यंत्रणा कधी करतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Crop Damage
अडीच महिन्यांनी पीक नुकसान काय पाहणार?

वऱ्हाडात १७ ते १९ जुलैदरम्यान संततधार पाऊस सुरू होता. अकोला, वाशीम, बुलडाणा या तीनही जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी दिली. सर्वच नदी-नाल्यांना पूर आले. प्रामुख्याने पूर्णा नदीला व तिच्या उपनद्यांना पूर आले. त्यामुळे अनेक मार्ग तासन् तास बंद होते. आता पूरपरिस्थिती निवळली असली तरी पुराच्या पाण्याने नदी-नाल्यांच्या काठावरील शेतशिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपात लागवड केलेली पिके खरडून गेली आहेत. सखल भागात आजही पिके पाण्याखाली आहेत.

Crop Damage
राज्यात पीक नुकसान ४५ लाख हेक्टरच्या पुढे

खारपाण पट्ट्यात येणाऱ्या शालीग्राम घटाळे यांच्या चार एकरांपैकी अर्ध्या शेतातून पाणी वाहल्याने जमीन खरडून गेली. सोयाबीन, तुरीचे पीक नामशेष झाले. सदानंद भदे यांचे चार ते पाच एकरांतील पीक नाल्याच्या पाण्याने खरडून नेले. खारपाण पट्ट्यात या सलग पावसाने मोठे नुकसान केले आहे.

‘कोणी बांधावर येईल का?’

सध्या जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत, पालक सचिवही इकडे आलेले नाहीत. अशा स्थितीत जिल्हा प्रशासनच शेतकऱ्यांचा आधारवड झालेले आहे. गेल्या तीन दिवसांत पाऊस, पुराने हाहाकार उडवला. हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले. अद्याप, या नुकसानग्रस्तांपर्यंत एक-दोन लोकप्रतिनिधी सोडले तर कुणीही आलेले नाही. आपली व्यथा मांडण्यासाठी शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात ७२ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणांना देण्यात आले आहेत. बऱ्याच ठिकाणी पाण्यामुळे शेतात जाता येत नाही. येत्या आठवडाभरात अंतिम अहवाल तयार होईल. त्यानंतर नुकसानीचे चित्र स्पष्ट होईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com