Sidhheshwar Sugar Factory : सिद्धेश्वर कारखान्यावरील कारवाईला विरोधासाठी शेतकऱ्यांचे ‘रास्ता रोको’

सोलापुरातील होटगी रोडवरील विमान तळावरुन विमानाच्या उड्डानासाठी अडथळा ठरणाऱ्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीला पाडण्याच्या मागणीला एकीकडे जोर आला असताना, आता हरिद लवादानेही कारखान्याचे गाळप बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
Cooperative Sugar Factory
Cooperative Sugar FactoryAgrowon

सोलापूर ः सोलापुरातील होटगी रोडवरील विमान तळावरुन विमानाच्या उड्डानासाठी अडथळा ठरणाऱ्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (Siddheshwar Cooperative Sugar Factory) चिमणीला पाडण्याच्या मागणीला एकीकडे जोर आला असताना, आता हरिद लवादानेही कारखान्याचे गाळप बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता.१) सोलापूर- विजयपूर या महामार्गावर हत्तूर नजीक रास्ता रोको आंदोलन करत या निर्णयाला विरोध केला.

Cooperative Sugar Factory
Farmer Insurance : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी करा अर्ज

साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आणि माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. माजी आमदार शिवशरण पाटील, माजी सभापती सौ. इंदुमती अलगोंडा पाटील, अशोक देवकते, कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, संचालक गुरुराज माळगे, अमर पाटील, शिवानंद पाटील, विद्यासागर मुलगे, प्रमोद बिराजदार, यांच्यासह अनेक शेतकरी यामध्ये सहभागी झाले. यावेळी बोलताना श्री. काडादी म्हणाले, सोलापूरचा विकास साधणाऱ्यांनी आधी रस्ते, पाणी आरोग्य, परिवहन सेवा अशा मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे, शेतकऱ्यांना भकास करून शहराचा विकास होणार नाही.

शासनानेही आता फार काळ बघ्याची भूमिका घेऊ नये, या संपूर्ण विषयात चर्चेतून तोडगा काढावा, असेही ते म्हणाले. यावेळी माजी आमदार शिवशरण पाटील म्हणाले, या कारखान्यावर पन्नास हजार कुटुंबाची उपजीविका अवलंबून आहे. विरोधकांनी आपली कुटिल कारस्थाने थांबवावीत, या विमानतळाआधी बोरामणी विमानतळ सुरु करावे, पण यानंतरही पुन्हा कारस्थान सुरु राहिले, तर आम्ही गप्प बसणार नाही, हातात कोयता घेऊन त्यांच्या मागे लागू, मग कायदा-सुव्यवस्था बिघडली, तर त्याला आम्ही जबाबदार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com