गटशेतीतून शेतकरी समृद्ध होऊ शकतो

‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांचे मत
गटशेतीतून शेतकरी समृद्ध होऊ शकतो
Sharad PawarAgrowon

माळेगाव ः ‘‘गटशेतीच्या (Group Farming) माध्यमातून शेतकरी स्वतःला समृद्ध करू शकतो, याचे उत्तम उदाहरण बारामती ॲग्रोस्टार फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या (Baramati Agrostar FPC) शेतकऱ्यांनी उभे केले आहे. या कंपनीने खाद्यतेलाचे (Edible Oil) (शेंगदाणा, करडई व सूर्यफूल तेल) उत्पादन करून पुण्यासह विविध शहरामधील बाजारपेठत स्वतःचा ‘जीवनम’ या नावाने ब्रॅंड विकसित केला आहे. स्पर्धेच्या युगात ही बाब शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी दिशादर्शक ठरत आहे,’’ असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला.

बारामती तालुक्यातील जळगाव सुपे येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली बारामती ॲग्रोस्टार फार्मर प्रोड्यूसर कंपनीतर्फे खाद्यतेल निर्मितीचा कारखाना, विक्री व्यवस्था उभारली आहे. गतवर्षी सुरू केलेल्या या उद्योगाला आता चांगलेच बाळसे आले आहे. त्या पार्श्वभूमीवर बारामतीत पवार यांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय मंडळाकडून माहिती घेतली. त्या वेळी ते बोलत होते. कंपनीचे अध्यक्ष सुनील जगताप, संचालक अनिल वाघ, आनंदराव खोमणे, संतोष जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी एकत्र येत गट शेतीतून उत्पादित मालावर प्रक्रिया उद्योग सुरू करावेत. अशा उद्योगांना शासनस्तरावर आर्थिक मदत होत आहे. खरेतर त्याचा फायदा जिरायती भागातील शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. शेतीबरोबर प्रक्रिया उद्योग व्यवसायाकडे वाटचाल केली तरच शेतकऱ्यांना अधिकचे दोन पैसे मिळतील.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com