Watermelon Cultivation : कलिंगडाच्या निकृष्ट रोपांमुळे फसवणूक

आता व्यापाऱ्यांनी या कलिंगडाच्या खरेदीला नकार दिला आहे. केवळ निकृष्ट दर्जाच्या रोपांमुळे हा प्रकार घडल्याचे सागर यांचे म्हणणे आहे.
watermelon
watermelonAgrowon

Solapur News : कलिंगडाच्या निकृष्ट दर्जाच्या रोपांचा पुरवठा (Watermelon Seedling) झाल्याने केडगाव (ता. करमाळा) येथील सागर गायकवाड या शेतकऱ्याचे सुमारे दोन‌ लाख रुपयांचे आर्थिक झाले असून, या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्याने संबंधित कंपनी आणि रोपवाटिकाधारकाकडे केली आहे. पण अद्यापही त्यांच्याकडून त्यांना दाद मिळालेली नाही.

केडगाव येथील सागर गायकवाड या युवा शेतकऱ्याने माढा तालुक्यातील एका खासगी रोपवाटिकेतून दोन एकर क्षेत्रावर कलिंगडासाठी सुमारे अकरा हजार रोपे खरेदी केली.

त्यासाठी आवश्यक सर्व मशागत करून बारा डिसेंबर रोजी कलिंगडाची लागवड केली. योग्य खत-पाणी व्यवस्थापन करून उत्कृष्ट असा प्लॉट तयार केला.

watermelon
watermelon : खानदेशात कलिंगड पीक परवडेना

अगदी दोन किलोपासून पाच किलो वजनाचे कलिंगड त्यांच्याकडे तयार झाले. परंतु हे कलिंगड फोडल्यानंतर आत लाल गर निघायला हवा, पण पूर्णपणे अर्धेकच्चे आणि पांढरा गर निघत आहे, शिवाय त्याला चवही नाही.

आता व्यापाऱ्यांनी या कलिंगडाच्या खरेदीला नकार दिला आहे. केवळ निकृष्ट दर्जाच्या रोपांमुळे हा प्रकार घडल्याचे सागर यांचे म्हणणे आहे. या संबंधी संबंधित कंपनी आणि रोपवाटिकाधारकाकडे तक्रार केली. पण उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. आता कृषी विभागालाही त्यांनी तक्रार दिली आहे.

watermelon
watermelon : खानदेशात कलिंगड पीक परवडेना
मी माझ्या दोन एकर क्षेत्रामध्ये संकरित कलिंगड रोपाची लागवड केली. आज ७० दिवसांनंतरही कलिंगड फोडल्यानंतर ते पांढरेच निघत आहे. त्यामुळे हे कलिंगड खरेदी करण्यास कोणीही व्यापारी तयार नाही. माझे श्रम, पैसे वाया गेले असून, सुमारे दोन लाख रुपयांची आर्थिक नुकसान झाले आहे. माझे नुकसान मला भरून मिळावे.
सागर गायकवाड, केडगाव, ता. करमाळा
कलिंगड रोपे खरेदीमध्ये फसवणूक झाल्याची केडगाव येथील सागर गायकवाड या शेतकऱ्याची तक्रार प्राप्त झाली असून, कृषी विभागाच्या वतीने प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे. लवकरच या संदर्भातील समितीद्वारे तपासणी करून तक्रारीत तथ्य आढळल्यास निश्‍चित कारवाई करण्यात येईल.
संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी, करमाळा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com