
राज्यात ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करा, गायरान (Grazing Land) आणि वन जमिनी असणाऱ्यांच्या नावे करा या मागण्यांसाठी राज्यभर किसान सभेच्या (Kiasan Sabha Agitation) वतीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामध्ये आंदोलना दरम्यान आंदोलनात सामील असणारे सोमनाथ पवार नावाचे शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
पवार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. आंदोलकांचा मृत्यू होऊनही राज्य सरकार दखल घेत नाही, म्हणून सरकारचा धिक्कार किसान सभेच्या वतीने धिक्कार करण्यात आला.
राज्यभरात 21 जिल्ह्यांमध्ये हजारो शेतकरी धरणे आंदोलनात ठाण मांडून बसले असताना व एका शेतकऱ्याचा आंदोलनात मृत्यू झालेला असताना देखील राज्य सरकारने अद्यापही आंदोलनाची दखल घेतलेली नाही. किसान सभा राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून उद्या किसान सभेच्या वतीने राज्यभरातील तहसील कार्यालयावर मोर्चे काढण्यात येणार आहे. राज्य सरकार आंदोलनाकडे हेतुत: दुर्लक्ष करत आहे. सरकारचे दुर्लक्ष आणि निर्ढावलेपणाचा किसान सभेने धिक्कार केला आहे.
राज्य सरकारने आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी. मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत करावी. तसेच किसान सभेने उपस्थित केलेल्या मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी किसान सभेने केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.