Vasmat APMC : वसमत बाजार समितीवर शेतकरी विकास पॅनेलचे वर्चस्व

निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलने १८ पैकी १३ जागांवर विजय संपादन करत बहुमत प्राप्त केले आहे. शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती बचाव पॅनेलला ३ जागा मिळाल्या तर १ जागी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
Ekta panel dominates Aurangabad milk team
Ekta panel dominates Aurangabad milk teamAgrowon

वसमत, जि. हिंगोली ः देशातील हळदीची प्रमुख बाजारपेठ असलेल्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडाळाच्या (Vasmat Agricultural Produce Market Committee) २०२२ ते २८ या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलने (Farmers' Development Panel) १८ पैकी १३ जागांवर विजय संपादन करत बहुमत प्राप्त केले आहे. शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती बचाव पॅनेलला ३ जागा मिळाल्या तर १ जागी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

Ekta panel dominates Aurangabad milk team
औरंगाबाद दूध संघावर एकता पॅनेलचे वर्चस्व 

वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी रविवारी (ता. २५) मतदान झाले. आमदार चंद्रकात नवघरे यांच्या शेतकरी विकास पॅनेल आणि माजी सभापती राजेश इंगोले यांच्या शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती बचाव पॅनेल तसेच अपक्ष मिळून ४० उमेदवारांनी निवडणूक लढविली. सोमवारी (ता. २६) मतमोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी आसाराम गुसिगे यांनी निकाल जाहीर केले. शेतकरी विकास पॅनेलला विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील ११ पैकी ७ जागा, ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्व ४ जागा, हमाल मापाडी आणि व्यापारी मतदारसंघातून प्रत्येकी १ जागा मिळाली आहे. विरोधकांना विविध कार्यकारी संस्था मतदासंघातील ४ तर व्यापारी मतदासंघातील १ जागेवर समाधान मानावे लागले.

विजयी उमेदवार ः

सहकारी संस्था मतदरासंघ ः सर्वसाधारण ः चंद्रकांत नवघरे, संभाजी बेले, तानाजी बेंडे, सचिन भोसले, गणेश इंगोले, माधव अंभोरे, खोब्राजी नरवाडे. महिला ः द्वरकाबाई चव्हाण, राजश्री कदम. इतर मागासवर्ग ः वैजनाथ भालेराव. वि.जा., भ.ज.विमाप्र ः गणपती तागडे. ग्रामपंचायत मतदासंघ सर्वसाधारण ः रमेश दळवी, दौलत हुंबाड. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ः संजय चिंतारे. आर्थिकदृष्ट्या मागास ः सतीश कुसळे. व्यापारी मतदारसंघ ः सुनील काबरा, विनोदकुमार झंवर. हमाल मापाडी मतदारसंघ ः अमजदखान पठाण.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com