Idol Farmer : कृषी विद्यापीठात ‘आयडॉल’ शेतकऱ्यांचा सत्कार

शेतीक्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून ‘आयडॉल’ म्हणून सन्मान केला जातो.
Idol Farmer
Idol FarmerAgrowon

नगर ः शेतीक्षेत्रात वेगवेगळे प्रयोग (Agriculture Experiment) करणाऱ्या शेतकऱ्यांचा महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून (MPKV) ‘आयडॉल’ (Idol Farmer) म्हणून सन्मान केला जातो. अशा आयडॉलची कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या हस्ते विद्यापीठात डॉ. नानासाहेब पवार सभागृहात सत्कार करण्यात आला.

Idol Farmer
Agricultural University : दैनंदिन आहारात ज्वारीच्या भाकरीचा वापर करा ः डॉ. ठाकरे

अधिष्ठाता (कृषी) डॉ. प्रमोद रसाळ, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, कुलसचिव श्री. प्रमोद लहाळे, नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, डॉ. दिलीप पवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. चिंतामणी देवकर, डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. गोरक्ष ससाणे, प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. पंडित खर्डे उपस्थित होते.

Idol Farmer
Agricultural University : कृषी तंत्र विद्यालयात पालक-शिक्षक मेळावा संपन्न

कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या संकल्पनेतून प्रत्येक महिन्याला विद्यापीठातून पदवी घेतलेला कृषी उद्योजक आणि एक प्रगतिशील शेतकरी अशा दोन ‘मफुकृवि’ आयडॉल्सचा कार्यपरिचयाचा फलक विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि विद्यार्थी वसतिगृहाच्या तसेच दहा जिल्ह्यांतील कार्यक्षेत्रातील कृषी महाविद्यालये, संशोधन केंद्रे, कृषी तंत्र विद्यालये या ठिकाणी प्रदर्शित केला जातो.

कुलगुरू डॉ. पाटील या वेळी म्हणाले, की या उपक्रमामुळे ग्रामीण युवक, विद्यार्थी तसेच शेतकऱ्यांना या आदर्श मफुकृवि आयडॉल्सपासून प्रेरणा मिळेल आणि त्यांचा आदर्श घेऊन सर्वांना नवीन ऊर्जा मिळेल. ते म्हणाले, की कोणत्याही इतर सत्कारापेक्षा ज्या मातीत आपण शिकलो तेथे पुरस्कार मिळाल्याचा वेगळा आनंद असतो.

विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता चांगले उद्योग स्थापन करू इतरांसाठी रोजगार निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले. सह्याद्री फार्मर्स कंपनीचे संस्थापक इंजिनिअर्स विलास शिंदे, तसेच यशस्वी कृषी उद्योजक डॉ. स्वप्नील बच्छाव, साहेबराव नवले पाटील, किरण कोठारी, दिलीप देशमुख, पंडित शिकारे, बाबासाहेब भोसले साहेबराव चिकणे, कृषिभूषण डॉ. दत्तात्रय वने, राहुल रसाळ, ज्ञानेश्‍वर बोडके, डाळिंबरत्न डॉ. बाबासाहेब गोरे, डॉ. संजीव माने, कृषिरत्न रशीद गावित, महादेव जाधव यांच्यासह प्रगतिशील शेतकरी या वेळी उपस्थित होते. प्रसारण केंद्राचे प्रमुख डॉ. खर्डे यांनी सूत्रसंचालन केले. नियंत्रक डॉ. भाकरे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com