Beekeeping : तमिळनाडूतील शेतकऱ्यांनी पुण्यात घेतले मधमाशीपालनाचे धडे

पुण्यातील केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्थेत तमिळनाडू राज्यातील शेतकऱ्यांना मधमाशीपालनाचे प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले.
Beekeeping Training
Beekeeping TrainingAgrowon

Pune News पुणे : पुण्यातील केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्थेत तमिळनाडू राज्यातील शेतकऱ्यांना मधमाशीपालनाचे प्रशिक्षणाचे (Beekeeping Training) धडे देण्यात आले. हे प्रशिक्षण ६ ते १० मार्च या कालावधीत देण्यात आले असून प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये एकूण २५ प्रतिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले.

तमिळनाडू राज्याताली कृष्णगिरी जिल्ह्याच्या फलोत्पादन (वृक्ष पीछे) विभागाकडून या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Beekeeping Training
Honey Village : ‘मधाचे गाव’ समृद्ध गावाच्या दिशेने एक पाऊल

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी संस्थेचे उपसंचालक प्राचार्य श्री बसवराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. याप्रसंगी संस्थेचे सहसंचालक सुनील पोकरे, डॉ. सर्वनन उपस्थित होते.

Beekeeping Training
Types Of Bee : मधमाशीपालनासाठी योग्य जाती

प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मधमाशीपालन व्यवस्थापन, प्रजनन या विषयावर संस्थेच्या सेवानिवृत्त उपसंचालिका डॉ. डेजी थॉमस यांनी व्याख्यान दिले.

तसेच शुभा मुजुमदार यांनी मधमाशांना होणारे रोग नियंत्रण या विषयावर, तर मध उत्पादने व त्यांचे उपयोग, मधमाशापालन यशोगाथा या संबंधी विवेक खालोकर यांनी माहिती दिली.

प्रतिक्षणाकरीता एक दिवस शिवसागर, मधुउद्योग, तळेगाव दाभाडे येथे अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संस्थेचे उपसंचालक प्राचार्य श्री. बसवराज यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सहसंचालक सुनील पोकरें यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com