Tomato Rate : टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकरी हतबल

कॅरेटला १०० ते २५० रुपये भाव
Tomato Rate
Tomato Rate Agrowon

कसबे सुकेणे  : दिवाळीनंतर टोमॅटो विक्रीमध्ये (Tomato Rate ) मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने टोमॅटो उत्पादन शेतकरी (Tomato Producer Farmers) हतबल झाला आहे. घसरते दरा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून लाखो रुपये खर्च करून तयार केलेला टोमॅटो अत्यंत अत्यल्प भावात विकण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. यामुळे कसबे सुकेणे परिसरात शेकडो एकरावर टोमॅटो तसाच शेतात आहे. सद्यःस्थितीत बाजारात कॅरेटला १०० ते २५० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कसा निघणार हा मोठा प्रश्न शेतकरी वर्गापुढे निर्माण झाला आहे.

Tomato Rate
Womens Farmer Producer Company : महिला शेतकरी कंपनीने रुजविला आत्मविश्‍वास

दिवाळीपूर्वी टोमॅटोचे दर कॅरेटला ५०० ते ८०० रुपये इतके होते. मात्र दिवाळी संपताच टोमॅटोचे दरात सुमारे पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण झाली आहे. मागील काही काळापासून शेतकरी वर्गावर निसर्गाची वक्रदृष्टी पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. चालू हंगामात गेल्या दहा दिवसापासून टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाल्याने केलेला खर्च वसूल होणे सुद्धा कठीण झाले आहे. सध्या कर्नाटक व मध्यप्रदेश चा टोमॅटो बाजारात दाखल झाल्यामुळे टोमॅटो बाजारात घसरण होत आहे. यंदाच्या चालू हंगामात सुरुवातीपासूनच टोमॅटोला चांगला भाव टिकून राहिला मात्र सतत पडणारा पाऊस अतिवृष्टी, ढगफुटी यामुळे टोमॅटो उत्पादनात मोठी घट झाली. परतीच्या पावसामूळे टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले. पडलेल्या बाजारभावामुळे शेतकरी हवालदिल
झाला आहे.

Tomato Rate
Tomato Rate : टोमॅटोच्या दरात घसरण का झाली?

टोमॅटो पिकाला भविष्यात मोठा बाजार भाव मिळेल या अपेक्षा पोटी उशिरा टोमॅटो लागवड करून टोमॅटो पिकासाठी मोठा खर्च केला. परंतु अचानक बाजार भाव कोसळल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. -विजय बोरस्ते, टोमॅटो उत्पादक, शेतकरी

जादा दराने फवारणी करत पीक वाढविले
टोमॅटोला चांगला दर मिळत असल्याने कसबे सुकेणे परिसरात अनेक द्राक्ष उत्पादक शेतकरी यांना द्राक्ष बाग तोडून त्यात टोमॅटोची लागवड केली. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चही केला. यात रासायनिक खताचे वाढलेले बाजार व खताची टंचाई असताना देखील शेतकऱ्यांनी जादा दराने औषध फवारणी करत पीक वाढविले. मात्र दर पडल्याने त्याचे आर्थिक कंबरडे मोडले असून तो आता हतबल झाला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com