शेतकऱ्यांनी घातला कृषिमंत्र्यांना घेराव

कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे शनिवारी (ता. २०) जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. रोहनखेड (नांदुरा) भागात त्यांना घेराव घालण्यात आला.
Abdul Sattar
Abdul SattarAgrowon

अमरावती : राज्यसह अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीने (Heavy Rain) शेती पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले. त्याची दखल घेत ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करावा. खरडून गेलेल्या शेत जमिनीसाठी सरसकट भरपाई देण्यात यावी, या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ओबीसी किसान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांना घेराव घातला.

Abdul Sattar
Crop Damage : तीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे शनिवारी (ता. २०) जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. रोहनखेड (नांदुरा) भागात त्यांना घेराव घालण्यात आला. खरडलेल्या शेत जमिनीची भरपाई मिळावी, पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, शासनाने भरपाईपोटी जी मदत जाहीर केली आहे त्यात वाढ करावी, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आंदोलन शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. कृषिमंत्र्यांच्या या भूमिकेचे आंदोलकांनी स्वागत केले. सतीश गोटे, सुनील पडोळे, नंदू खडसे, दिलीप भगत, किशोर भिलकर, सतीश तुळे, संदीप काळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेत शिवारात पुरती दाणादाण उडाली आहे. त्याची दखल घेत शासनाने शेतकऱ्यांना नियम, अटीखाली झुलवत न ठेवता सरसकट मदत करण्याची अपेक्षा आहे.

- प्रकाश साबळे,

राष्ट्रीय अध्यक्ष, ओबीसी किसान महासंघ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com