देशात यंदा कापसाची विक्रमी लागवड

यंदाच्या खरीप हंगामात देशात कडधान्याच्या क्षेत्रात ५-१५ टक्के घट होण्याची शक्यता आहे. तूर, मूग आणि हरभरा यांच्यात तुलनेत चांगला दर मिळणाऱ्या सोयाबीन, ऊस, मका आणि कापूस या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसते.
देशात यंदा कापसाची विक्रमी लागवड
cottonagrowon

कापसाला गेल्या हंगामात विक्रमी भाव मिळाल्यामुळे यंदाही शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कापूस हे देशातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. परंतु कापसासाठी शेतकऱ्यांना तुलनेने जास्त गुंतवणूक करावी लागते. तसेच पावसाचे आगमन, वितरण तसेच कीड-रोगांचा प्रादुर्भाव यावर कापूस उत्पादन अवलंबून असते. त्यामुळे बाजारात कापसाचे दर (rate)चढे असतील तरच शेतकऱ्यांना हे पीक परवडते. यंदा मात्र शेतकऱ्यांसाठी (farmer)स्थिती अनुकूल असल्याचं चित्र आहे. कापसाच्या आंतरराष्‍ट्रीय आणि देशांतर्गत बाजारपेठेत कापसाचे दर चांगले राहण्याचा अंदाज आहे. तर दुसऱ्या बाजूला यंदा देशात पावसाचे प्रमाण समाधानकारक राहील, मॉन्सून लवकर आलेला असून देशात सरासरीच्या १०३ टक्के पाऊस होऊल असा सुधारित अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

देशात यंदाच्या खरीप हंगामात कापसाची(cotton) विक्रमी लागवड होण्याची चिन्हे आहेत. यंदा कापसाच्या लागवक्षेत्रात तब्बल १५ टक्के वाढ होण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय)ने वर्तवला आहे. गेल्या हंगामात शेतकऱ्यांना कापसातून चांगले पैसे मिळाले. त्यामुळे शेतकरी इतर पिकांऐवजी कापसाला पसंती देतील, असं मानलं जात आहे.

लागवड क्षेत्र वाढल्यामुळे कापूस उत्पादनात वाढ झाल्यास स्थानिक आणि जागतिक बाजारपेठेतील कापसाचे भडकलेले दर कमी होण्यास मदत होईल, असे उद्योगक्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

‘‘इतर पिकांपेक्षा शेतकऱ्यांना कापसातून चांगला परतावा मिळाला. त्यामुळे यंदाच्या खरिपात देशात कापूस लागवडीचे क्षेत्र १५ टक्क्याने वाढेल,'' असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय)चे अध्यक्ष अतुल गणात्रा म्हणाले. गेल्या वर्षी १२० लाख हेक्टरवर कापसाची लागवड झालेली होती. यंदा ती १३८ लाख हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. सीएआयच्या मते गुजरात आणि महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रवाढ होण्याचा अंदाज आहे. या दोन राज्यांत मिळून देशातील जवळपास निम्मा कापूस पिकवला जातो. सरलेल्या वर्षात कापसाचे दर दुप्पटीहून जास्त वाढले. कारण कापूस काढणीच्या काळात जोरदार पाऊस झाल्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कापूस उत्पादनाने गेल्या दहा वर्षांतील निचांकी पातळी गाठली.

महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि राजस्थान या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये तेलबिया आणि कडधान्य पिके कापसाला स्पर्धा करतात. यंदा कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याने तेलबिया, कडधान्यांचे क्षेत्र कमी होईल. गेल्या काही वर्षांत कडधान्य पिकांतून शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळालेल नाही. त्यामुळे हे शेतकरी कापसाकडे वळतील, असे मानले जात आहे. गुजरातमध्ये भुईमुगाचे क्षेत्र कमी होऊन कापसाचे वाढेल, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रात कृषी विभागाने कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज गृहित धरून नियोजन केले आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा बीटी कपाशीची १ कोटी ७१ लाख पाकिटांहून अधिक बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. एक जूनपासून राज्यभर बीटी कापूस बियाण्यांची विक्री सुरू झालेली आहे, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दिली. तसेच सोयाबीन, कापसाला मोठी मागणी असल्याने एक हजार कोटी रुपये खर्च करुन या दोन पिकांमध्ये उत्पादकतावाढ व मूल्यवर्धनाचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

cotton
कडधान्याच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com