Crop Damage Compensation : मुंडगाव मंडळातील शेतकऱ्यांना अद्यापही मदत नाही

खरीप हंगामात अकोट तालुक्यातील मुंडगाव महसूल मंडळात ढगफुटी तसेच परतीच्या पावसामुळे शेती खरडून गेली होती.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Akola News : खरीप हंगामात अकोट तालुक्यातील मुंडगाव महसूल मंडळात ढगफुटी तसेच परतीच्या पावसामुळे शेती खरडून गेली होती. या आपदग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत एक रुपयांची मदत मिळाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या मंडळातील शेतकऱ्यांना मदत कधी मिळेल, असा प्रश्‍नही विचारल्या जात आहे.

अकोट तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली होती. या ढगफुटीमुळे अनेक ठिकाणी शेतातील पिकांचे नुकसान झाले, नदी-नाल्यांना पूर आल्याने पाणी शेतात शिरले व पिकासह शेती खरडून गेल्याने मंडळातील अनेक गावांना त्याचा फटका बसला होता.

Crop Damage
Crop Damage Compensation : मार्चतील नुकसानीस नागपूर, कोकण विभागाला २७ कोटी
Crop Damage
Crop Damage Survey : धुळ्यात वादळी पावसामुळे नुकसानीचे पंचनामे पूर्ण

नदी काठावरील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तहसीलदारांच्या सूचनेनुसार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकामार्फत पंचनामे करण्यात आले. त्यानुसार अकोट तालुक्यातील मुंडगाव मंडळ सोडून सर्व मंडळातील शेतकऱ्यांना मदतही मिळाली.

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गावात ढगफुटी झाल्याने नुकसान झाले. माझ्या शेतातून पुराचे पाणी गेल्याने पूर्ण पीक वाहून गेले होते. जमीन खरडून गेली. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांनी पंचनामा केला. परंतु अद्यापपर्यंत शासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही.- प्रमिला वानखडे, शेतकरी, वणी वारुळा

मुंडगाव मंडळातील शेतकऱ्यांना अद्यापही खरडून व पूरग्रस्ताची मदत मिळाली नाही. इतर मंडळातील शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. त्यामुळे मुंडगाव मंडळातील शेतकऱ्यांवर असा अन्याय का केला जात आहे.

- श्रीकृष्ण नाहाडे, मुन्ना अग्रवाल, गजानन वारकरी शेतकरी, मुंडगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com