Wet Drought : टेम्ब्रूसोंडा मंडलातील शेतकरी मदतीपासून वंचित

तहसीलदार, आमदार राजकुमार पटेल यांना निवेदन
Wet Drought
Wet Drought Agrowon

जामली, जि. अमरावती : चिखलदरा तालुक्यातील टेम्ब्रूसोंडा (Tembrusonda) महसूल मंडलातील २४ गावांतील शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या पिकांच्या आर्थिक मदतीतून वगळले आहे. मदत मिळावी म्हणून माजी सभापती बन्सी जामकर (Bansi Kamkar) यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी तहसीलदार, तसेच आमदार राजकुमार पटेल यांना लेखी निवेदन दिले.

Wet Drought
Wet Drought : ओल्या दुष्काळाचे कोरडे वास्तव

चिखलदरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांची शेती जुलै व ऑगस्टमध्ये पावसामुळे वाहून गेली. पिके धोक्यात आली. शासनाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा करून सुद्धा टेम्ब्रूसोंडा महसूल मंडलातील २४ गावांना शासनाच्या जाचक अटींमुळे वगळण्यात आले आहे. त्यामुळे ती मदत शेतकऱ्यांना त्वरित मिळावी, यासाठी जामकर यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी तहसीलदार माया माने तसेच आमदार राजकुमार पटेल यांना निवेदन दिले.

Wet Drought
Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करा

यात भाजपच्या तालुकाध्यक्ष हिरूजी हेकडे, टेम्ब्रूसोंडा ग्रामपंचायतचे उपसरपंच सुरेश खडके, रामबाबू दहीकर, प्रकाश जामकर, म्हातू जामकर, नानजी दहीकर, बिसराम दहीकर, माणिक बेलसरे, ओंकार बेलसरे, गायना दहीकर व इतर शेतकऱ्यांचा समावेश आहे.

पुरामुळे आमच्या जमिनी पूर्णतः खरडून गेल्या. त्यात सोयाबीन व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले. तलाठ्यांनी पंचनामे केले. त्यात ७० ते ८० टक्के नुकसान झाल्याचे दाखविले तरीही आम्हाला मदतीपासून वगळले. हा शासनाचा अन्याय आहे.
- बन्सी जामकर, माजी सभापती, पंचायत समिती चिखलदरा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com