Jayant Patil : राज्यात शेतकरी चिंतेत, सरकार आयोध्येत

राज्यातील शेतकरी, शेतमजूर संकटात असताना अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे.
Jayant Patil
Jayant PatilAgrowon

Mumbai News राज्यातील शेतकरी वादळी पावसामुळे (Unseasonal Rain) चिंतेत असताना अख्खे सरकार देवदर्शनासाठी आयोध्येत जाऊन बसले आहे. असे पहिल्यांदाच घडले आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सोमवारी (ता. १०) केली.

वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे (Crop Damage) सरकारचा सहानुभूतीचा दृष्टिकोन नाही. वादळी पाऊस वेगवेगळ्या भागात पडत आहे. ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची सरकारची भूमिका नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.

ते म्हणाले, की राज्यातील शेतकरी, शेतमजूर संकटात असताना अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा होती मात्र सरकार अयोध्येला जाऊन बसले आहे.

पहिल्यांदाच देवाच्या दर्शनासाठी अख्खे सरकार जाते हा प्रकार दिसतो आहे. या सरकारला राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही देणे घेणे नाही. म्हणूनच महाराष्ट्राबाहेर फिरण्याचे काम व त्याला प्रचंड प्रसिद्धी देण्याचे काम सुरू आहे.

Jayant Patil
Hailstorm Crop Damage : विदर्भात गारपिटीचा पिकांना मोठा फटका

संसदीय समितीची (जेपीसी) मागणी करत असताना समितीत सत्ताधारी लोकांची संख्या जास्त असते त्यामुळे निष्कर्ष त्यांच्या हातात असतो.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जी कमिटी नियुक्त केली आहे, ती कमिटी चांगल्या प्रकारे चौकशी करेल हा दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. बाकी वेगळे काही नाही, असेही ते म्हणाले.

Jayant Patil
Crop Damage Compensation : हातकणंगलेतील एक हजार ८१ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई

‘पंतप्रधानांच्या पदवीवर चर्चा होणारच’

पदवी आहे म्हणून ते पंतप्रधान झाले, असे म्हणण्याचे कारण नाही. पंतप्रधानांनी पदवी आहे असे सांगितले तर त्याची चिकित्सा पब्लिक डोमेनमध्ये आल्यावर होणारच. या देशातील नागरिक आपापल्या मार्गाने चिकित्सा करत आहेतच. त्यांची पदवी आहे म्हणून त्यांना पंतप्रधान केले नाही.

पण त्यांनी एकदा ही माझी पदवी आहे, असे सांगितले तर त्याची चिकित्सा होणारच. लोकशाहीत लोकांमध्ये आलेल्या चर्चेची चिरफाड होणे व वेगवेगळी मते व्यक्त होणे व त्याचा खरेपणा किंवा खोटेपणा प्रसिद्ध होणे त्यावर लोकांनी मते मांडणे हे स्वाभाविक आहे.

त्यामुळे ज्यांची पदवी आहे ती माझी आहे की नाही यावर कोणतेही भाष्य पंतप्रधान करत नाहीत, तोपर्यंत ही मतमतांतरे आणि चर्चा लोक करणारच.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com