Crop Damage : सततच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत

येवला व नांदगाव तालुका वगळता पावसाने जिल्ह्यात सर्वदूर धुमाकूळ घातला. अशा परिस्थितीत सध्या खरीप हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत असताना त्यांचे नुकसान वाढते आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

सप्टेंबरच्या पहिल्या दिवसापासून जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने जोर (Heavy Rainfall) धरला आहे. त्यामध्ये येवला व नांदगाव तालुका वगळता पावसाने जिल्ह्यात सर्वदूर धुमाकूळ घातला. अशा परिस्थितीत सध्या खरीप हंगामातील (Kharif Season) पिके वाढीच्या अवस्थेत असताना त्यांचे नुकसान वाढते आहे. ओला दुष्काळ (Wet Drought) सदृश परिस्थितीचा फटका चालुवर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना बसला आहे.

रोज दुपारनंतर एक ते दोन तास मुसळधार पाऊस होऊन सर्वत्र पाणीचपाणी होते. त्यामुळे ओढे-नाल्यांना पूर येऊन अनेक भागांत शिवारात पाणी शिरते. त्यामुळे शेतांचे बांध फुटून माती वाहून गेले. सुरगाणा महसूल मंडलात सर्वाधिक ४९ मिमी पावसाची नोंद झाली.

इगतपुरीतील घोटी मंडलात ४२ मिमी पाऊस नोंदविला गेला. निफाडच्या पश्चिम पट्ट्यातील शिरवाडे वणी परिसरात मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली. वेगवेगळ्या भागांत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे.

Rain Update
Rain Update : धरणक्षेत्रात पावसाचा जोर

मुसळधार पावसाचे पाणी शिवारांतून वाहिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले, बांध तुटून शिवारांचे नुकसान झाले. द्राक्ष बागांमधून पाण्यामुळे माती वाहून गेली. सप्टेंबर हंगामातील पूर्व ऑक्टोबर हंगामातील गोडीबहार द्राक्ष छाटणी तोंडावर आहे, परंतु, पाऊस थांबत नसल्याने छाटण्या लांबणीवर जाऊन एकंदरीत झाल्यास उत्पादन एकदाच येऊन अडचणी निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

Rain Update
Monsoon Rain: विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

इगतपुरी व सुरगाणा तालुक्यांत पावसाचा जोर होता. तर सटाणा, नांदगाव, सुरगाणा, पेठ, निफाड, सिन्नर, चांदवड,. त्र्यंबक, देवळा येथील शेतकरी सततच्या पावसामुळे अडचणीत सापडले आहेत. नाशिक शहर परिसरात माध्यम हलक्या सरी झाल्या. तर येवला तालुक्यात किरकोळ पाऊस होता.

Rain Update
Abdul Sattar : कृषी विद्यापीठांचे कार्य शेतकऱ्यांना संजिवनी देण्याचे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com