Cotton Harvesting : शेतकऱ्यांनी जाणले शास्त्रोक्त कापूस वेचणीचे तंत्रज्ञान

स्मार्ट कॉटन प्रकल्पांतर्गत दर्जेदार कापूस उत्पादनासाठी सावनेर तालुका कृषी विभागाच्या वतीने कापूस वेचणीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सावनेर व खापा मंडळातील शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
Cotton Harvesting
Cotton HarvestingAgrowon

नागपूर : स्मार्ट कॉटन प्रकल्पांतर्गत दर्जेदार कापूस उत्पादनासाठी (Cotton Production) सावनेर तालुका कृषी विभागाच्या वतीने कापूस वेचणीपूर्व (Cotton Harvesting) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सावनेर व खापा मंडळातील शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

Cotton Harvesting
Organic Cotton : शेतकऱ्यांनी जाणले सेंद्रिय कापूस उत्पादनाचे तंत्र

खापा मंडळातील भेंडाळा, भानेगाव, इसापूर, नंदापूर, गडेगाव आणि सावनेर मंडळातील मानेगाव, कुसुंबी, कोदेगाव, पंढरी, कवठा, उमरी, सावळी सिल्लोरी या गावांमध्ये कापूस वेचणीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक कापसाच्या उत्पादन, मार्केटिंगबाबत माहिती देण्यात आली. कापसाच्या गुणवत्तेचे गुणधर्म धाग्याची लांबी, मजबुती, परिपक्वता, रंग, जिनिंगसाठी आवश्यक असलेली ओलाव्याची टक्केवारी व कचरा या सर्व बाबींचा कापसाच्या बाजार मूल्यांवर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस वेचणी करताना योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.

Cotton Harvesting
Cotton Market : शेतकऱ्यांनी घाबरू नये, कापूस तेजीतच राहणार | Agrowon | ॲग्रोवन

याशिवाय कापूस पिकावरील लाल्या, कृषी विभागातील महाडीबीटी व इतर योजनांच्या बाबत सांगण्यात आले. ड्रोनद्वारे कपाशी पिकावर फवारणीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. कापूस वेचण्यासाठी वापरावयाच्या बॅगचे वाटप यावेळी करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी शुभांगी राठोड यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या उपक्रमात सावनेर मंडळातील गावांमध्ये मंडळ अधिकारी अभिलाषी येरमे, पर्यवेक्षक हरिचंद्र मानकर, कृषी सहाय्यक ईश्वर घोडमारे, कृषी सेवक तेजल बनसोड, मंगल वाघमारे, तर खापा मंडळात कृषी पर्यवेक्षक रोशन डंबरे, कृषी सहायक अनिल खरपपुरे, पूजा इंगळे, मीनल वैद्य हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com