शेतकरी चळवळ, कार्यकर्त्यांना समाजाने पाठबळ द्यावे

शेतकरी चळवळीत काम करण्यासाठी तुपकर यांना अधिक सुकर व्हावे, या साठी त्यांच्या मित्र परिवाराने एकत्र येत लोकवर्गणी करून वाहन खरेदी केले. हे वाहन रविवारी (ता. १२) रात्री येथे झालेल्या कार्यक्रमात तुपकर यांना सुपूर्द करण्यात आले.
शेतकरी चळवळ, कार्यकर्त्यांना समाजाने पाठबळ द्यावे
Ravikant TupkarAgrowon

बुलडाणाः गोरगरीब, शेतकरी, सामान्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, शेतकरी चळवळीत राबणाऱ्यांना समाजाने पाठबळ दिले पाहिजे, असे मत येथे झालेल्या कृतज्ञता सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना वाहन देण्यासाठी त्यांच्या मित्र परिवाराने कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. या वेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक कवी विठ्ठल वाघ होते. माजी मंत्री महादेव जानकर, पोपटराव पवार, बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्‍याम चांडक, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव ओमप्रकाश शेटे, सत्यपाल महाराज, ॲड. शर्वरी तुपकर, पत्रकार संदीप काळे आदी उपस्थित होते.

Ravikant Tupkar
बियाणे दरवाढीचे दरवर्षी शेतकऱ्यांच्या डोक्यावर ओझे

शेतकरी चळवळीत काम करण्यासाठी तुपकर यांना अधिक सुकर व्हावे, या साठी त्यांच्या मित्र परिवाराने एकत्र येत लोकवर्गणी करून वाहन खरेदी केले. हे वाहन रविवारी (ता. १२) रात्री येथे झालेल्या कार्यक्रमात तुपकर यांना सुपूर्द करण्यात आले. उद्याच्या काळात पाण्यासाठी मोठा संघर्ष होईल. पाण्याच्या हंड्यासाठी माणसे एकमेकांच्या डोक्यात दगड घालतील. पर्जन्यमानाचे दिवस बदलले. माती वाहून जात आहे. मातीच राहिली नाही तर तुम्ही आपण काय पिकवणार,’’ असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर येणारे कार्यकर्ते सुद्धा गरजेचे आहेत. तेच जर राहले नाहीत, तर उद्या शेतकरी रस्त्यावर आत्महत्या करतील. यासाठी कार्यकर्ते, चळवळीला पाठबळ द्यायला हवे,’’ असेही पवार म्हणाले. वाघ म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी, मित्र परिवाराने लाखो रुपये जमा करुन उभे केलेले हे वाहन नसून लाखो हातांचा आशिर्वाद आहे. जमविलेले लाखो चाहते आणि हा लोकसंग्रह म्हणजे रविकांतची संपत्ती आहे. लोकवर्गणीतून मिळालेल्या वाहनामुळे तुपकर यांची चळवळ आणखी गतिमान होईल. वीना दिघे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप चव्हाण यांनी आभार मानले.

ही जबाबदारी आता पेलावी तरी कशी? सर्वांच्या या ऋृणातून मुक्त होणे शक्य नाही. लोकवर्गणीतून मिळालेले हे वाहन शेतकरी चळवळ आणि सर्व सामान्यांच्या हितासाठी लढण्यास बळ देणारे आहे. यापुढे जगणार आणि मरणारही शेतकरी आणि निस्वार्थ कार्यकर्त्यांसाठीच. त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.

रवीकांत तुपकर, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com