शेतकऱ्यांनी संघटित होऊन लढा देण्याची गरज ः राजू शेट्टी

पिकांचे नुकसान होऊनसुद्धा विमा कंपन्या भरपाई देत नाहीत. या विमा कंपन्या व केंद्र आणि राज्य सरकारचे साटेलोटे आहे. कोणताही राजकीय पक्ष शेतकऱ्यांचा वाली राहिलेला नाही.
Raju Shetti
Raju ShettiAgrowon

संग्रामपूर, जि. बुलडाणा ः पिकांचे नुकसान (Crop Damage) होऊनसुद्धा विमा कंपन्या भरपाई (Crop Insurance Compensation) देत नाहीत. या विमा कंपन्या व केंद्र आणि राज्य सरकारचे साटेलोटे आहे. कोणताही राजकीय पक्ष शेतकऱ्यांचा वाली राहिलेला नाही.

म्हणून आता शेतकऱ्यांनी संघटित होऊन लढाई लढण्याची गरज असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले.

Raju Shetti
Cotton Crop Damage : ‘आकस्मिक मर’ने कापूस उत्पादक हैराण

ते गुरुवारी (ता.१५) संग्रामपूर तहसीलसमोर आयोजित दुष्काळ दखल मोर्चात बोलत होते. बस स्टॅंडपासून खासदार शेट्टी, विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर, प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा मोर्चा तहसीलवर पोहोचला. या ठिकाणी जाहीर सभा झाली.

शेट्टी पुढे म्हणाले, ‘‘ शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. विना अट पीकविमा मंजूर करावा. राज्यात स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करून मंडळांतर्गत शेतमजुरांना सर्व सवलती लागू करा व दरमहा चार हजार मानधन द्या,’’ असेही ते म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com