Crop Damage : ‘मदती’ साठी शेतकऱ्यांची अधिकाऱ्यांना नोटीस

संपूर्ण तालुक्यात चालू वर्षी अतिवृष्टी झालेली आहे. सततच्या पावसामुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. पण तांत्रिक कारणे देत ही मदत नाकारली जात आहे.
Government Aid
Government AidAgrowon

जि. सोलापूर ः संपूर्ण तालुक्यात चालू वर्षी अतिवृष्टी (Wet Drought) झालेली आहे. सततच्या पावसामुळे खरीप पिकांसह (Kharip Crop) फळबागांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे. पण तांत्रिक कारणे देत ही मदत नाकारली जात आहे. त्यात फळबागायतदारांना तर पूर्णपणे वगळले आहे, त्यामुळे तालुक्यातील सुमारे तीन हजार ८०० शेतकऱ्यांना अनुदानच मिळाले नाही, हे अनुदान तातडीने द्या, नाही तर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करू, असा इशारा देणारी नोटीस बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह, तहसीलदार, कृषी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.

Government Aid
Government Scheme : चार लाख शिधापत्रिकाधारकांची दिवाळी होणार गोड

चिखर्डे (ता. बार्शी) येथील भगवंत पाटील, संभाजी कोंढारे, दिगंबर रणखांब या तीन शेतकऱ्यांनी अॅड. विकास जाधव यांच्यामार्फत जिल्हाधिकारी सोलापूर, तहसीलदार बार्शी, तालुका कृषी अधिकारी बार्शी आणि गटविकास अधिकारी, बार्शी यांना ही नोटीस बजावली आहे. शेतकऱ्यांनी त्यात म्हटले आहे, की १२ ऑगस्ट रोजी तहसीलदार व कृषी अधिकारी यांनी स्वाक्षरीने पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले, फळबागांचेही पंचनामे करावेत, असा आदेश दिले.

नुकसानीची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे पंचनामे केले नाहीत. तीन हेक्टरपर्यंतच्या फळबागांचे पंचनामे केले, पण पंचनामे झाल्यानंतर शासनाच्या परिपत्रकातून फळबागांना अनुदान देणार नसल्याचे जाहीर केले. खांडवी व बार्शी या दोन मंडलांतील शेतकऱ्यांना पंचनाम्याप्रमाणे फळबागांना व शेतीपिकांच्या नुकसानीस अनुदान दिले.

पण उर्वरित आठ मंडलांमध्ये प्रचंड नुकसान होऊनही तांत्रिक कारणे देत खरीप पिकांसह फळबागांना वगळण्यात आले आहे. यात या आठ मंडलांतील आमच्यासह तीन हजार ८०० शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांसह आमची फसवणूक झाली आहे, खरिपासह फळबाग शेतकऱ्यांचा चुकीचा अहवाल शासनास दिला आहे. तांत्रिक कारणे देऊन आम्हाला मदत नाकारली जात आहे. आता तर रोजच पाऊस पडतो आहे, सध्या सीताफळ, लिंबू, द्राक्ष पिकाची गोडी बहाराची छाटणी झाली नसल्याने द्राक्ष पीक संपुष्टात आले आहे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com