Crop Damage Compensation : गिरणा पट्ट्यातील शेतकरी मदतीपासून वंचित

भडगाव तालुक्यात ११ जून २०१९ ला मॉन्सूनपूर्व वादळी पाऊस झाला. त्यात ८ ते १० खेड्यांतील ८५२ शेतकऱ्यांचे ५६७ हेक्टरवरील केळी व फळबागा उद्ध्वस्त झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon

भडगाव, जि. जळगाव : वादळी पावसाने नुकसान (Heavy Rain Crop Damage) होऊन तीन वर्षे लोटली तरी शेतकऱ्यांना शासनाकडून दमडीही मिळाली नाही. त्यामुळे या नुकसान भरपाईबाबत (Compensation) शासनाने १५ दिवसांच्या आत निर्णय घ्यावा, अन्यथा नुकसानग्रस्त शेतकरी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Crop Damage
Crop Damage : आठवडाभरात ५० हजार हेक्टर सोयाबीनवर पाणी

भडगाव तालुक्यात ११ जून २०१९ ला मॉन्सूनपूर्व वादळी पाऊस झाला. त्यात ८ ते १० खेड्यांतील ८५२ शेतकऱ्यांचे ५६७ हेक्टरवरील केळी व फळबागा उद्ध्वस्त झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्या वेळी तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदत मिळवून देण्याबाबत आश्‍वासन दिले. त्यानंतर आमदार किशोर पाटील यांनीही याबाबत सातत्याने पत्रव्यवहार केला. मात्र तीन वर्षे होत आली तरी भरपाई मिळालेली नाही.

सुधारित प्रस्तावानंतरही उपेक्षा

या संदर्भात २६ एप्रिल २०२२ ला तत्कालीन मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या दालनात बैठक झाली. त्यांच्या सूचनेनुसार सुधारित प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. मात्र त्यावर काहीएक हालचाल होताना दिसत नाही. वादळात १० ते १५ वर्षे जगविलेले फळबागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे भरपाई केव्हा मिळेल0 असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

Crop Damage
Crop Damage : तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या

तालुक्याला वगळले

शासनाकडून ३० ऑगस्ट २०२२ ला जळगाव जिल्ह्यासाठी जुलै ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३५ कोटीची मदत जाहीर केली. मात्र भडगाव तालुक्यात ११ जून २०१९ ला वादळी पावसात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जुलैऐवजी जून २०१९ पासून कालावधीचा सुधारित शासन निर्णय काढण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

शेतकरी उपोषणाच्या पवित्र्यात

तीन वर्षांपासून मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात १५ दिवसांत काही निर्णय न झाल्यास गिरणा पट्ट्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंगळवारी तहसीलदार मुकेश हिवाळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पिचर्डे येथील दीपक महाजन, वडजी येथील सुधाकर पाटील (पत्रकार), स्वदेश पाटील, भाऊसाहेब परदेशी, दीपक पाटील, शिवणीचे प्रवीण पाटील, बोदर्डेचे सोमनाथ पाटील, मनोज पाटील आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com