Tasgaon : कवठेएकंदच्या शेतकऱ्यांचे तासगाव येथे उपोषण सुरू

तहसील कार्यालयासमोर ठिय्या; शेतातील रस्ते दुरुस्तीची मागणी
Andolan
AndolanAgrowon

कवठे एकंद, जि. सांगली : येथील शेतशिवारातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, ते पक्के करावेत, यासाठी सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा योजना व ग्रामस्थांच्या वतीने तासगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले. शिवारातील रस्त्यांची दुरुवस्था झाली आहे. पश्चिम भागातील नांद्रे वाट, डिग्रज वाट, बिसूरवाट, बेंद्री रस्ता, नागाव तिरका रस्ता, मिरज वाट, जाधव मळा, जुना तासगाव रस्ता असे रस्ते देखभाल दुरुस्तीअभावी गैरसोयीचे बनले आहेत. रस्त्यांचे दुखणे कित्येक वर्षांपासून आहे. ठोस निर्णय घेण्यासाठी तासगाव तहसील कार्यालय येथे धडक देत आंदोलन सुरू केले आहे.

Andolan
Crop Damage : गारपिटग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदानासाठी उपोषण

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जुन्या चावडीपासून शेतकऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात झाली. हलगी, घुमक्याच्या निनादात घोषणाबाजी करीत प्रमुख मार्गावरून शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. शेकडो ट्रॅक्टर घेऊन शेतकरी व ग्रामस्थ सहभागी झाले. तासगाव तहसील कार्यालयासमोर रस्त्यांच्या प्रश्नासाठी कवठेएकंदकरांनी ठिय्या मारला. सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा संस्थेचे संस्थापक शंकरराव माळी, डॉ. नरेंद्र खाडे, उपाध्यक्ष रामचंद्र थोरात, नागसेन कांबळे, सूर्यकांत पाटील, शिराज मुजावर, प्रा. बाबूराव लगारे, प्रवीण वठारे, दीपक घोरपडे, सरपंच राजेंद्र शिरोटे, दीपक जाधव, विजयराव पाटील, प्रकाश देसाई, बाळासो पवार, सर्जेराव पाटील, संजय थोरात, बाळासो शिरोटे, भाऊसाहेब शिरोटे, विद्यासागर लंगडे, राजू ढेबर आदि शेतकरी, सर्वपक्षीय कार्यकर्ते आंदोलनत सहभागी झाले.

Andolan
मजुरांच्या भत्त्यासाठी किसान सभेचे जुन्नर येथे उपोषण

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, विश्वास पाटील, मणेराजुरीचे खंडू पवार, बाबूराव जाधव, अर्जुन थोरात, पांडुरंग जाधव, अमोल शिंदे, बाळासाहेब पाटील यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. तहसीलदार रवींद्र रांजणे, गटविकास अधिकारी अविनाश मोहिते यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रस्त्याच्या समस्यांबाबत उपाययोजना सुरू आहेत. शेतकऱ्यांनी आक्रमक होऊ नये, अशी विनंती तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com