Farmer Loan : सक्तीच्या कर्जवसुलीविरुद्ध शेतकरी संघटना आक्रमक

जिल्हा बँकेकडून सुरू असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांच्या सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटनेने गुरुवारी (ता. १) आक्रमक भूमिका घेतली.
District Bank
District Bank

निफाड, जि. नाशिक : जिल्हा बँकेकडून (District Bank) सुरू असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांच्या सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटनेने गुरुवारी (ता. १) आक्रमक भूमिका घेतली. निफाड येथील नवीन तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चा निफाड येथील शासकीय विश्रामगृहापासून निघून नवीन तहसील कार्यालयात आणण्यात आला. या मोर्चात शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघर्ष संघटना, मनसे शेतकरी सेनेच्या प्रतिनिधींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

District Bank
Farmer Insurance : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी करा अर्ज

मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. ‘शेतकरी’ जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. संदीप जगताप, अॅड. अभिजित बोरस्ते, ‘शेतकरी संघर्ष’चे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, संतू पाटील झांबरे, किरण पाटील, निवृत्ती गारे, भदाणे सर, बाबासाहेब गुजर, माणिक निकम, बाळासाहेब चौधरी, शैलेंद्र कापडणीस यांची भाषणे झाली.

या वेळी सर्वांनीच कर्जदार शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या जिल्हा बँक वसुलीविरोधात आक्रमक भूमिका मांडली. याप्रसंगी भगवान बोराडे, सोपान संधान, एकनाथ धनवटे, रामनाथ ढिकले, शंकर ढिकले आदींसह शेतकरी उपस्थित होते.

तहसीलदार कल्पना निकुंभ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सक्तीच्या कर्ज वसुलीविरोधात शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या लढ्याला निफाड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.

शेतकऱ्यांच्या मागण्या :

जिल्हा बँकेने वसुली थांबवावी

वसुलीसाठी अपसेट प्राइज ठरवावे

District Bank
Agri Tourism : विषमुक्त शेतीतून कृषी पर्यटनाला आधार

कर्जदार शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव थांबवा

राष्ट्रीय बँकांप्रमाणे एकरकमी परतफेड योजना राबवावी

कृषी पंपाचे कनेक्शन तोडण्याची मोहीम थांबवावी

निफाड तालुक्यात दिवसा वीजपुरवठा करावा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com