Wheat Cultivation : शेतकऱ्यांची गव्हाच्या पिकाला पसंती

यंदा गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने पुणे विभागातील अनेक शेतकरी गहू पिकाकडे वळाले. यावर्षी पुणे विभागात सरासरी एक लाख ६८ हजार ७९६ हेक्टरपैकी दोन लाख १० हजार ४६३ म्हणजेच १२५ टक्के पेरणी झाली आहे.
Wheat Cultivation
Wheat Cultivation Agrowon

पुणे ः यंदा गव्हाच्या पेरणीस (Wheat Sowing) उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने पुणे विभागातील अनेक शेतकरी गहू पिकाकडे (Wheat Crop) वळाले. यावर्षी पुणे विभागात सरासरी एक लाख ६८ हजार ७९६ हेक्टरपैकी दोन लाख १० हजार ४६३ म्हणजेच १२५ टक्के पेरणी झाली आहे.

सरासरीच्या तुलनेत पेरणीच्या क्षेत्रात (Wheat Acreage) तब्बल ४१ हजार ६६७ हेक्टरने वाढ झाली आहे. सध्या पिके जोमात असून उत्पादनात (Wheat Production) काही प्रमाणात वाढ होणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Wheat Cultivation
Wheat Market : गहू विक्रीसाठी निविदा; दरात नरमाई

पावसाळ्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे गहू पीक पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांचा होता. गव्हाच्या पेरणीसाठी नोव्हेंबर ते डिसेंबर हा कालावधी चांगला असतो.

मात्र, उशिराने झालेल्या पावसामुळे आणि वेळेत वाफसा न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या करण्यास सुरुवात केली. सध्या अनेक ठिकाणी गहू पिके वाढीच्या व निसवण्याच्या अवस्थेत आहे.

पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग, नगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुके, सोलापुरातील अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, मोहोळ हे तालुके गव्हाच्या पिकांसाठी ओळखली जात असून, विभागात अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे.

Wheat Cultivation
Wheat : सरकार का विकणार ३० लाख टन गहू?

नगर जिल्ह्यातही चांगली पेरण्या झाली असून, आतापर्यंत सर्वाधिक गव्हाचे पेरणी पाथर्डी, शेवगाव तालुक्यात झाली आहे. दोन्ही तालुक्यांत सुमारे १२ हजार ८९ हेक्टरच्या दरम्यान गव्हाची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल नेवासा, कोपरगाव, नगर, राहाता, पारनेर, राहुरी, कोपरगाव या तालुक्यांतही चांगली पेरणी झाली आहे.

जामखेड, संगमनेर, अकोले, कर्जत या तालुक्यांत काहीशा कमी पेरण्या झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात सर्वाधिक गव्हाची पेरणी झाली आहे. सुमारे सात हजार ५२४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ शिरूर, इंदापूर, दौंड, पुरंदर, जुन्नर या तालुक्यांत चांगल्या पेरण्या झाल्या आहे.

तर हवेली, मुळशी, मावळ, वेल्हे, भोर, आंबेगाव तालुक्यात कमी पेरण्या झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातही अक्कलकोट तालुक्यात सुमारे १७ हजार १४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यानंतर दक्षिण सोलापूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा या तालुक्यांतही चांगली पेरणी झाली आहे.

पुणे विभागात झालेली गव्हाची पेरणी, हेक्टरमध्ये ः

जिल्हा --- सरासरी क्षेत्र --- झालेली पेरणी -- टक्केवारी

नगर --- ८६,४०५ -- १,०५,७२२ ---१२२

पुणे --- ३९,८०३ --- ४१,३३०-- १०४

सोलापूर --- ४२५८८ --- ६३,४११ -- १४९

एकूण -- १,६८,७९६ -- २,१०,४६३ -- १२५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com