
औरंगाबाद : शेतीशी संबंधित सर्वच क्षेत्रांचा जणू मेळाच औरंगाबादमधील कलाग्रामध्ये अवतरला आहे. शेती, (Farm) पशुसंवर्धन, (Animal Husbandry) सिंचन व्यवस्थापनापासून (Irrigation Management) ते तरुण शेतकरी, कंपन्यांनी विकसित केलेल्या नव्या उद्योजकांचे व्यापक दालन या प्रदर्शनात पाहण्याची संधी शेतकऱ्यांना मिळते आहे.
‘सकाळ ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात आलेला जालन्याचा संकेत मोरे पाटील हा पुण्याच्या सिंहगड कॉलेजमधून एबीए केलेला तरुण. बीएसस्सी अॅग्री केल्यानंतर त्याने घरच्या शेतीत सीताफळ आणि आवळ्याची लागवड केली.
वडिलांनी गटशेती संघ तयार केला आहे, यात सहभाग घेत त्याने सीताफळ लागवडीचे नवे तंत्रज्ञान तयार केले आहे. शिवाय सीताफळ आणि आवळ्यापासून तयार केलेले पदार्थ ही त्यांची खासियत आहे.
एका झाडाला २५ फळे घेणे आणि एकरी ४५४ झाडे लावण्याचे तंत्र विकसित करून उत्पादकतेत वाढ केल्याचे त्याने सांगितले.
या पद्धतीने उत्पादन घेतल्यास एकरी एक लाख १३ हजार रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. वडिलांनी गटशेतीच्या माध्यमातून तयार केलेले नेटवर्क आम्ही अधिक समृद्ध करत असल्याचेही त्याने सांगितले.
वीज गेली की पाणी बंद, वीज आली तर वेळ नाही, अशा अनेक कारणांनी शेतीच्या पाण्याचे गणित बिघडते. कधी अतिपाण्याने पिकाचे नुकसान होते.
तर कधी पाण्याचा ताण आल्याने उत्पादन घटते. शिवाय मजुरांची कमतरता हा मोठा प्रश्न सोडविण्यासाठी सिक्का या कंपनीने शेतीच्या पाण्यासाठी तयार केलेले तंत्रज्ञान प्रदर्शनात उत्सुकतेचा विषय बनले आहे.
या तंत्रज्ञानाचे संकल्पक जसवीर सिंग आणि अभय हाके आहेत. शेतीला पाणी देण्यासाठी मानवी बळाला मर्यादा येतात. विजेच्या लपंडावामुळे अनेकदा पाणी नियोजन बिघडून जाते. त्यासाठी ऑटोमेशन सिस्टिम तयार करण्यात आली आहे.
मोबाईलवरून आपल्या शेतातील पाणी आणि खते देणे, पॉलिहाउस असेल तर त्याचे वातावरण नियंत्रण, तापमान, आर्द्रता नियंत्रणाची एक प्रणाली मोबाईलवरून नियंत्रित करण्यात येते. शेतकरी इथे आवर्जून थांबून माहिती घेत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.