Wild Animal Crop Damage : चंदगडमध्ये शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चा

वन्य प्राण्यांकडून शेतीच्या नुकसानीच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.
Wild Buffalo
Wild BuffaloAgrowon

Kolhapur News वन्य प्राण्यांकडून शेतीच्या नुकसानीच्या (Wild Animal Crop Damage) प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.

तालुक्याच्या पश्चिम भागातील वन्य प्राण्यांनी त्रस्त विविध गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रश्नी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना सुचवणारे मागणी पत्र नायब तहसीलदार अशोक पाटील, वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले यांना दिले.

पंचायत समिती कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे, शेतकऱ्याला शंभर टक्के मदत मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत मोर्चा नवीन वसाहत, आंबेडकर नगरमार्गे तहसील कार्यालयाजवळ आला.

या वेळी मोर्चासमोर बोलताना संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील म्हणाले, की वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे अनेक शेतकऱ्यांनी जमीन कसणे सोडले आहे.

Wild Buffalo
Wild Animal Attack : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पाच वर्षात १६ बळी

गावागावात मोठ्या प्रमाणात पिकाऊ जमीन पड पडत आहे. या प्राण्यांच्या बंदोबस्ताबाबत वन विभागाकडे कोणतीही ठोस उपाययोजना नाही. तकलादू उपाययोजना राबवल्या जातात. त्याचा शेतकऱ्याला उपयोग नाही. त्यामुळे त्यांनी वरवरचे उपाय सोडून ठोस उपाययोजना अमलात आणाव्या. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन चर्चा घडवून आणावी, अशी मागणी केली.

Wild Buffalo
Wild Animal Crop Damage : वन्यप्राण्यांकडून पीक नुकसानीचे काय?

धैर्यसिंह सावंत भोसले म्हणाले, की जंगलातील गवे आता गावात आणि घरापर्यंत पोहोचले आहेत. त्यांचा बंदोबस्त न झाल्यास भविष्यात शेतकऱ्यांमधून उद्रेक होण्याची शक्यता आहे.

गोविंद मासारणकर, सुधाकर पाटील, सुरेश हरेर, अजित बांदेकर, आरती पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सहमती दर्शवली.

त्याचवेळी शेतकऱ्यांतून त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार झाला. जांबरे भागात दाखल झालेले हत्ती कसे हुसकावणार, असा प्रश्न केल्यावर त्यांनी ते जास्त दिवस राहणार नाहीत, अशी शक्यता वर्तवली.

त्यावर तुमचे पाहुणे तुमच्या क्षेत्रात ठेवून घ्या, आम्हाला त्याचे लाड सांगू नका, अशा शब्दात सुनावले. विक्रम मुतकेकर, कृष्णा पाटील, सीताराम भोंगाळे, महादेव देसाई, रामचंद्र गुरव, मनोहर गावडे, संजय गावडे सहभागी झाले होते. एम. के. पाटील यांनी आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com