Salam Kisan: `सलाम किसान`च्या माती परीक्षण व ड्रोन प्रात्यक्षिकांना शेतकऱ्यांचा प्रतिसाद

सलाम किसान समूह गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करत आहेत. त्यांना विविध सेवा पुरवत आहे. त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Agriculture Drone
Agriculture DroneAgrowon

Salam Kisan Group सलाम किसान समूह आणि भिसी विविध कार्यकारी सहकारी संस्था यांनी संयुक्तपणे भिसी (ता. चिमूर, जि. चंद्रपूर) शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (ता. १०) मोफत माती परीक्षण (Soil Testing) व ड्रोन फवारणीचे (Drone Spraying) प्रात्यक्षिक आयोजित केले होते. ए. एन. लॉन येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

भिसीचे प्रगतिशील शेतकरी मनोहर मुंगले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. महाराष्ट्र कृषीभूषण पुरस्कार विजेते मोरेश्वर झाडे कार्यक्रमाचे उद्घाटक होते.

भिसी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष अभय मुंगले व उपाध्यक्ष सुनिल खवसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

`सलाम किसान`चे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय खोब्रागडे आणि अॅग्री ऑपरेशन मॅनेजर परेश कुल्लरकर यांनी मार्गदर्शन केले.

Agriculture Drone
Salam Kisan: वाटूर प्रकल्पाचा समावेश `जलयुक्त शिवार`मध्ये करणारः मुख्यमंत्री शिंदे

या कार्यक्रमामध्ये `सलाम किसान`ने स्टॉल लावून शेतकऱ्यांच्या माती नमुन्यांचे परीक्षण करून दिले. आयआयटी कानपुर या संस्थेने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या ९० सेकंदात मातीचे परीक्षण करून देण्यात आले.

Agriculture Drone
Salam Kisan: पंचमहाभूत लोकोत्सवात `सलाम किसान`चा सहभाग

सलाम किसान समूह गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करत आहेत. त्यांना विविध सेवा पुरवत आहे. त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

भिसी येथील कार्यक्रमातही `सलाम किसान`च्या नाविन्यपूर्ण आणि सर्वोत्कृष्ट तंत्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी युवा शेतकऱ्यांपासून ते अबालवृद्धांपर्यंत मोठी गर्दी झाली होती. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच सलाम किसान देत असलेल्या वेगवेगळ्या सेवांची माहिती त्यांनी जाणून घेतली.

शेतकऱ्यांचा हा प्रतिसाद पाहून १२ मार्च ते १९ मार्च दरम्यान एकनाथी भागवत सप्ताहातही हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. `सलाम किसान`च्या स्टॉलवर माती परीक्षण व ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

सलाम किसान शेतकऱ्यांच्या निरनिराळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कार्यरत असून विविध उपक्रम आणि सेवांचा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्यने लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले.

या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण SSCN केबल तर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे निमंत्रक व `सलाम किसान`चे डिजिटल मिडिया प्रमुख सुमित मुंगले यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com