Home Grown Seed : घरगुती बियाणे, ‘बीबीएफ’द्वारे शेतकऱ्यांचे ९८ कोटी रुपये वाचले

Seed Production : उत्पादन खर्च कमी होण्यासोबतच शेतकऱ्यांचा ताणही कमी व्हावा, यासाठी कृषी विभागाने घरगुती बियाणे वापरण्याचा सल्ला दिला आहे.
Rabi Seed
Rabi SeedAgrowon

Amravati News : उत्पादन खर्च कमी होण्यासोबतच शेतकऱ्यांचा ताणही कमी व्हावा, यासाठी कृषी विभागाने घरगुती बियाणे वापरण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्यांचा तसेच बीबीएफचा वापर करून ९७ कोटी ५२ लाख रुपयांची बचत केली आहे.

गतवर्षीच्या हंगामात सोयाबीन बियाण्यांचा दर १०० ते ११० रुपये होता. पेरणीसाठी प्रतिहेक्टर साधारणतः अडीच बॅग लागतात. ३० किलोची एक बॅग राहत आहे. प्रतिहेक्टर ७५ किलो बियाणे लागते. बाजारातील दर बघता पेरणीसाठी बियाण्यांचा खर्च अधिक राहतो.

Rabi Seed
Bogus Seed : बोगस बियाणे विक्रीविरोधात कडक कारवाई करा

बाजारदराने बियाणे घेतल्यास वाढणारा खर्चाचा ताण कमी व्हावा, यासाठी घरगुती बियाण्यांचा वापर करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यासाठी गावपातळीवर बीज परीक्षण व उगवण क्षमता तपासणीचे प्रशिक्षण देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

‘खरीप हंगाम २०२२-२३’ मध्ये जिल्ह्यात २ लाख ५२ हजार ११७ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी होती. यासाठी १ लाख ८९ हजार ८८ क्विंटल बियाणे लागण्याची शिफारस करण्यात आली होती.

यापैकी ६६,१८१ क्विंटल बियाणे कृषी केंद्रांमार्फत विकले गेले. तर तब्बल १ लाख २२ हजार ९०७ क्विंटल घरगुती बियाण्यांचा वापर करून ९४.६३ कोटी रुपयांची बचत केली आहे.

Rabi Seed
Soybean Seed : उगवणक्षमता तपासून घरातील सोयाबीन बियाणे पेरा

बीबीएफ व पट्टापेर पद्धतीने शेतकऱ्यांची प्रतिहेक्टर १५ किलो बियाण्याची बचत होत आहे. गेल्या हंगामात त्यांनी ३७५० क्विंटल बियाण्यांची बचत केली. एमआरपीनुसार ४.५० कोटी व किमान आधारभूत किमतीने १.६१ कोटी रुपयांची बचत केली आहे. या हंगामात बीबीएफ व पट्टापेर पद्धतीने २.८९ कोटीची बचत झाली आहे.

घरगुती बियाण्यांची उगवणक्षमता तपासण्यासाठी गावपातळीवर प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. गेल्या काही वर्षांत या बियाण्याचा वापर केल्याने शेतकऱ्यांचा पेरणीखर्च वाचला आहे. त्या बियाण्यांचे निकालही चांगले आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्यांच्या वापरावर अधिक भर द्यावा.
- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com