
अमरावती : गाव पातळीवरच शेतमालावर प्रक्रिया (Processing of farm produce) करून त्या आधारे शेतमालाचे मूल्यवर्धन करून अधिक नफा कमविण्यासोबतच शेतकऱ्यांनी रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा त्याकरिता पोखरा योजनेतील अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन पोखराचे प्रकल्प संचालक परिमल सिंह (Parimal Singh) यांनी केले.
चांदूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत कृषी सहयोग शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रकल्पस्थळ, प्रक्रिया उद्योग तसेच गोदामाची पाहणी त्यांनी केली. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. पोखरा योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी तसेच वैयक्तिक शेतकऱ्यांना झालेल्या लाभाचा आढावादेखील त्यांनी यावेळी चर्चात्मक कार्यक्रमातून घेतला.
अमरावती विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे (पाटील), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, आत्मा प्रकल्पसंचालक निस्ताने, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते तसेच चांदूरबाजार तालुका कृषी अधिकारी एस. पी. दांडेगावकर व क्षेत्रीय कर्मचारी या वेळी उपस्थित होते. कृषी सह्योग शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांनी यावेळी त्यांच्याद्वारे राबविण्यात आलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.