शेतकऱ्यांनी अत्याधुनिक शेती आत्मसात करावी

शेतीमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. इस्राईलमधील शेतकरी नव्या तंत्रज्ञानामधील सुपर कॉम्प्युटर, डिव्हाइस अशा आयुधांच्या साह्याने प्रिसिजन फार्मिंग अर्थात अत्याधुनिक शेती करत आहेत.
Shekhar gaikwad
Shekhar gaikwad Agrowon

संगमनेर, जि. नगर ः ‘‘शेतीमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. इस्राईलमधील शेतकरी नव्या तंत्रज्ञानामधील (Agriculture Technology) सुपर कॉम्प्युटर (Super Computer), डिव्हाइस अशा आयुधांच्या साह्याने प्रिसिजन फार्मिंग (Precision Farming) अर्थात अत्याधुनिक शेती (Modern Agriculture) करत आहेत. इथला शेतकरी शेतात जाण्यापूर्वी संगणकाच्या कक्षात जाऊन कोणत्या झाडाला काय कमी आहे, याची माहिती घेत असतो. त्यानुसार तिथला शेतकरी आज कितव्या क्रमांकाच्या झाडाला पाणी, खते-औषधे द्यायचे आहे, याचा तपशील घेऊनच शेतीचे व्यवस्थापन करतो. आपल्या शेतकऱ्यांनीही असा बदल आत्मसात करायला हवा,’’ असे मत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.

Shekhar gaikwad
Sugarcane : ऊस दराचा प्रश्न आणि वस्तुस्थिती

संगमनेर (जि. नगर) येथे आयडियल फाउंडेशनतर्फे आयोजित शेतकऱ्यांच्या गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी पद्मश्री राहीबाई पोपेरे, संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, समाजसेविका ममता सकपाळ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवर, कृषी महाविद्यालय पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, प्रकल्प समन्वयक राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे डॉ. धमेंद्रकुमार फाळके, हवामान अभ्यासक पंजाबराव डख, संगमनेरचे माजी उपनगराध्यक्ष विवेक कासार, फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश औताडे, उपाध्यक्ष वैभवकुमार जाधव, सचिव रवींद्र पाटील हे उपस्थित होते.

Shekhar gaikwad
Sugarcane : सांगलीत आडसाली ऊस लागवड संथ गतीने

गायकवाड म्हणाले, ‘‘गेल्या दहा-बारा वर्षांत शेतीमध्ये मोठा बदल झाला आहे. शेतकऱ्यांनी शेतीचे नवे तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे. तरच शेतीमधील उत्पन्न वाढ साध्य होईल. आता ड्रोन द्वारे फवारणीचे तंत्रज्ञान आले आहे. औषध फवारणी सोपी झाली आहे. आयडियल फाउंडेशन आणि प्रकाश औताडे यांची टीम शेतीच्या आधुनिकतेसाठी झटते आहे, हे कौतुकास्पद हे आहे.’’

पोपेरे म्हणाल्या, ‘‘महिला शेतकऱ्यांना पुरस्कार मिळाला, याचा आनंद आहे. शेतकऱ्यांना सन्मान भेटला पाहिजे, त्यांच्या कष्टाची पावती मिळते. मी देशी बियाण्यांसाठी काम केले. काळी माती अन्न देणारी देवता आहे. काळी माता जपली पाहिजे.’ औताडे म्हणाले, ‘‘फाउंडेशन शेतकऱ्यांच्या विकासाठी कार्यरत आहे. कमीत कमी उत्पादन खर्च ठेवून सर्वाधिक उत्पन्न घेतलेल्‍या महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमधील ४१ शेतकऱ्यांचा आम्ही या निमित्ताने आयडियल फार्मर ॲवॉर्ड देऊन सन्मान केला, त्यांचे कौतुक केले.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com