Farmer training : शेतकरी प्रक्षेत्र प्रशिक्षण दौऱ्याचे आयोजन शेतकऱ्यांनी १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना राज्यांतर्गत प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 Farmer training
Farmer training Agrowon

अकोला : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना राज्यांतर्गत प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अकोट उपविभागांतर्गत अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातुर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी या दौऱ्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी एस. एस. शिंदे यांनी केले.

फलोत्पादन तसेच कृषी क्षेत्राशी निगडित काम करणाऱ्या संशोधन संस्था, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, पुणे, नगर, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यांत भारतीय संशोधन परिषद (ICAR) अद्ययावत कृषी विज्ञान केंद्र तसेच कृषी विद्यापीठे फलोत्पादन पिकाबाबत कार्यरत आहेत.

तसेच फलोत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रात काम करणारे शेतकरी, प्रक्रिया केंद्र या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी अनुदानावर ९० शेतकरी प्रशिक्षणार्थीचा पाच दिवसीय अभ्यास दौरा व प्रक्षेत्र प्रशिक्षण नियोजन केले आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

 Farmer training
Agri Commodity MSP : रब्बी हंगामातील पिकांसाठी हमीभाव जाहीर | ॲग्रोवन

प्रक्षेत्र प्रशिक्षण दौऱ्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवड, कांदा चाळ, संरक्षित शेती, प्राथमिक प्रक्रिया आदींचा लाभ घेतला आहे. किंवा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना प्रक्षेत्र प्रशिक्षण अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करता येईल.

शेतकऱ्यांनी अर्ज संबंधित गावाच्या कृषी सहायकामार्फत किंवा स्वतः तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपूर्ण माहितीसह गुरुवार (ता. १०) पर्यंत सादर करावा, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com