Crop Damage Compensation : शेतकऱ्यांना लवकर भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन

शेतकऱ्यांसाठी फार काही केल्याचा आव आणत शासनाने वाढीव मदतीची घोषणाही केली त्याचे आदेशही निघाले. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मात्र मिळाली नाही.
Crop Damage
Crop DamageAgrowon

यवतमाळ : अतिवृष्टी (Heavy Rain) व संततधार पावसामुळे (Continuous Rain) शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. (Crop Damage Due To Heavy Rain) शेतकऱ्यांसाठी फार काही केल्याचा आव आणत शासनाने वाढीव मदतीची घोषणाही केली त्याचे आदेशही निघाले. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मात्र मिळाली नाही. या प्रकाराचा निषेध करीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डफडे बजाव आंदोलन करण्यात आले.

Crop Damage
Crop Damage : उन्हामुळे कातळावरील शेती करपण्यास सुरुवात

घाटंजी तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनाची दखल न घेतल्यास या पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात सुमारे पावणे पाच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होते. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने खंड दिला. त्यानंतर जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. या पावसामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले.

Crop Damage
Crop Damage : साडेसात लाख अतिवृष्टीग्रस्त शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत

शासन आदेशानुसार प्रशासनाकडून नुकसान सर्व्हेक्षण व पंचनाम्याची प्रक्रिया पार पडली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शासनाकडून आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, सर्व्हेक्षण व पंचनामे होऊन देखील शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कोणतीच मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जगण्या मारण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना शासनाने सरसकट हेक्‍टरी पन्नास हजार रुपयांची मदत करणे अपेक्षित होते. परंतु त्या संदर्भात कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे सत्तेतील राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची उपेक्षा केली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

घाटंजी तालुक्यातील शिरोली, घोटी, साखरा, घाटंजी, शिवनी या परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची दखल घेत तत्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी आहे. आंदोलनात वंचितचे तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे, खेमचंद पवार, नितीन राठोड, तुकाराम कोरवते, हेमराज कुमारे, अनिल रामटेके, डोंगरसिंग खोब्रागडे, खुशाल शेलुकर, विनायक नगराळे, प्रेमानंद उंबरे, यशवंत भगत, गौरव शेंडे, सूरज रामटेके, साहिल रामटेके, विनीत जवादे, नयन गाडे, दीक्षांत वासनिक, उत्तम बोरकर यांनी सहभाग घेतला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com