Sugarcane Sowing : शेतकऱ्यांनी उसाची लागवड करावी; प्रगतीसाठी साथ देऊ

‘द्वारकाधीश’चे अध्यक्ष शंकरराव सावंत यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
Sugarcane Sowing
Sugarcane SowingAgrowon

जि. नाशिक : उसाचा हमीभाव शेतकऱ्यांना (Sugarcane Rate) फायदेशीर असतो व कुठल्याही हवामानाचा उसाला फटका बसत नाही. उत्पादन चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होत आहे. कारखान्याकडून शेतकऱ्यांना एक रकमेत बिल अदा केले जातात. त्याच्यात कुठलीही फसवणूक होत नाही.शेतकऱ्यांनी उसाची लागवड करावी. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी साथ देऊ, असे आश्वासन द्वारकाधीश साखर कारखान्याचे (Dwarkadhish Sugar Mill) अध्यक्ष सावंत (Shankarao Sawant) यांनी दिले.

Sugarcane Sowing
Sugarcane Cultivation : नांदेड विभागात एक लाख ६४ हजार हेक्टरवर उस लागवड

सावतावाडी (ता. मालेगाव) येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी ‘ऊस विकास व ऊस संवर्धन’ या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी राहुल देसले, हेमंत खैरनार, सावतावाडीचे सरपंच दीपक मोहिते, वडनेरचे सरपंच अर्जुनसिंह ठाकोर, नामपूर बाजार समिती संचालक डॉ. दीकपाल गिरासे, खाकुर्डी सोसायटी अध्यक्ष राजेंद्र ठाकरे, शंकर शेवाळे, ज्ञानेश्वर बोरसे, हरिभाऊ बोरसे, उमेश भावसार, जितेंद्र ठाकोर, किशोर पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते. शेतकी अधिकारी विजय पगार यांनीही मार्गदर्शन केले.

सावंत म्हणाले, ऊस लागवड केल्यास ऊस बेणे, निविष्ठा तसेच कारखान्यापर्यंत ऊस पोहोविण्यापर्यंत आम्ही मदत करू. शेतकऱ्यांच्या बांधावर कारखान्याचे शेतकी अधिकारी येऊन मार्गदर्शन करतील. ज्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत होईल. उसाच्या क्षेत्र वाढीसाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणे गरजेचे आहे.

माती परीक्षण करून शेतीला आवश्यक ते घटक, खते वापरल्यास शेती फायदेशीर ठरते. बदलते हवामान, अतिवृष्टीमुळे सध्या सर्वच पिकांचे नुकसान होत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांसह सर्वच शेतकऱ्यांनी ऊस पीक लागवडीकडे वळल्यास उत्पादन वाढून प्रगतीत निश्चितच भर पडेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com