
नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा कंपनीस (Insurance Companey) पीकविमा (Crop Insurance) भरलेला असून तो तत्काळ योग्य नुकसानीसह मिळावा, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शर्मा यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, की खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी व खराब हवामानामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात घेतलेल्या मका, बाजरी, सोयाबीन, कांदा, मठ, मूग, उडीद, भात, नागली, वरई, डाळिंब, द्राक्ष आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हाती काही आलेले नाही. जिल्ह्यातील १ लाख ६३ हजार ९७१ शेतकऱ्यांनी पीकविमा नियमानुसार भरलेला असून त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पीक विमाधारक शेतकरी पीकविम्याचे लाभार्थी ठरलेले आहेत. विमा कंपनीची जी मदत आहे ती अत्यंत तुटपुंजी असून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा होत असल्याचे नमूद केले आहे.
पीकविमा मिळावा अन्यथा
जिल्ह्यातून शेतकरी उद्रेक करतील
आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली नाही, त्यांना व्याज, दंडासह योग्य निकषाप्रमाणे रक्कम देण्यात यावी. त्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांचा अंत न पाहता २४ तासांच्या आत पीकविमा मिळावा अन्यथा जिल्ह्यातून शेतकरी उद्रेक करतील, असेही निवेदनात म्हटले आहे. तसेच, जिल्ह्यात १५० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला असून जिल्हा बँकेतर्फे सक्तीने होत असलेल्या वसुलीस तात्पुरती स्थगिती मिळावी यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक महाराष्ट्र शेतकरी कर्ज परतफेड योजना शेतकरीहितासाठी तयार करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
नाशिक जिल्ह्यातील
पीक विमाधारक शेतकरी
तालुका विमाधारक संख्या
बागलाण २,४८४
दिंडोरी ५३१
मालेगाव ४५,४८८
निफाड ६,४२२
सुरगाणा २,४८९
चांदवड १२,१७५
इगतपुरी १३,४६३
नांदगाव २३,०७९
पेठ ३,८५७
त्र्यंबकेश्वर २,९२९
देवळा ७,९३५
कळवण .७,१७९
नाशिक ३८६
सिन्नर ७,५७४
येवला ९,९८०
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.