Chana Sowing : ‘शेतकऱ्यांनी हरभरा पिकास युरिया खताची मात्रा देऊ नये’

चालू वर्षात चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध झाला आहे. जमिनीमध्ये ओलावा भरपूर असल्यामुळे या रब्बी हंगामात हरभरा पिकाची सरासरी क्षेत्राच्या १२६ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे.
Chana Sowing
Chana SowingAgrowon

वाशीम : चालू वर्षात चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध झाला आहे. जमिनीमध्ये ओलावा भरपूर असल्यामुळे या रब्बी हंगामात (Rabi Season) हरभरा पिकाची (Chana Crop) सरासरी क्षेत्राच्या १२६ टक्के क्षेत्रावर लागवड (Chana Sowing) झाली आहे. हरभरा हे पीक द्विदल धान्य वर्गीय असल्यामुळे या पिकास युरियातून नत्र मात्रा देण्याची आवश्यकता नाही. काही शेतकरी युरिया खत देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसानच होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.

Chana Sowing
Chana Sowing : हरभरा पेरणीचा वेग जास्तच

याबाबत त्यांनी म्हटले, की जिल्ह्याचे हरभरा पिकाचे सरासरी क्षेत्र ६० हजार ८४३ हेक्टर असून आतापर्यंत प्रत्यक्ष पेरणी ७६ हजार ८०० हेक्टरवर झाली आहे. हरभरा पिकाची स्थिती समाधानकारक असून पीक वाढीच्या अवस्थेत व काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पिकास युरिया खत दिल्यामुळे पिकाची कायिक वाढ जास्त होऊन पीक लुसलुशीत होते.

पिकाचा काटकपणा कमी होऊन किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. युरिया खत दिल्यामुळे पीक स्फुरद, पलाश, झिंक व लोह इत्यादी घटक जमिनीत उपलब्ध असून सुद्धा घेऊ शकत नाही. त्यामुळे उत्पादनात घट येते. हरभरा पिकास युरिया खत दिल्या‍मुळे अतिरिक्त उत्पादन खर्च वाढून फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होते. तरी शेतकऱ्यांनी हरभऱ्यास युरिया खताची मात्रा देऊ नये, असेही तोटावार यांनी म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com