Banned Pesticide : शेतकऱ्यांनी बंदी असणारी कीटकनाशके खरेदी करू नये

विक्रेत्यांवर कारवाई करणार, कृषी अधिकारी नीलेश बुधवंत
Ban Fertilizers
Ban FertilizersAgrowon

जुन्नर, जि. पुणे ः ‘‘बंदी असलेल्या कीटकनाशकांची खरेदी करून ती शेतकऱ्यांना विकणाऱ्या विक्रेत्यांवर (Fertilizers Sellers) कारवाई करून त्यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल,’’ असा इशारा जुन्नर तालुका पंचायत समितीचे (Junnar Taluka Panchayat Samite) कृषी अधिकारी तथा बी-बियाणे, खते व औषधे गुण नियंत्रण अधिकारी नीलेश प्रकाश बुधवंत (Nilesh Prakash Bhudvant) यांनी दिला आहे.

Ban Fertilizers
Kharip Crop : परभणातील १०८ गावांत हंगामी पैसेवारी ५० पेक्षा कमी

जुन्नर येथे अहमदनगर जिल्ह्यातील दोघांना बंदी घातलेल्या कीटकनाशकांची सार्वजनिक ठिकाणी टेम्पोतून विक्री करताना आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडील सुमारे दोन लाख ५४ हजार २९० रुपये किमतीची कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत.

Ban Fertilizers
Crop Damage : पातूर, बार्शी टाकळीतील पीक नुकसानीसाठी मिळाले १० कोटी १५ हजार ३५१

ज्याअर्थी लोक अशा प्रकारची बंदी असलेली कीटकनाशके घेऊन विक्रीसाठी आणतात त्याअर्थी तालुक्यातील काही विक्रेते सदरची औषधे खरेदी करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे यापुढे बंदी असलेली कीटकनाशकांची खरेदी करून ती शेतकऱ्यांना विकणाऱ्या तालुक्यातील विक्रेत्यावर अधिक गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे.

Ban Fertilizers
Lumpy Skin Vaccination : जळगावात पशुधनाचे १०० टक्के लसीकरण

सरकारने शेतीवरील १८ प्रकारच्या औषधांवर बंदी घातली आहे. तालुक्यातील ज्यांच्या दुकानांमध्ये अशा कीटकनाशकांचा साठा आढळून येईल, त्या विक्री केंद्राच्या मालकावर जवळच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल.

Ban Fertilizers
Lumpy Skin : नुकसानग्रस्त पशुपालकांना अर्थसाह्य द्या

शेतकऱ्यांनीदेखील बंदी असलेल्या कीटकनाशकांची खरेदी करू नये तसेच जी औषधे दुकानदारांकडून खरेदी करतो त्याची बिले न चुकता संबंधित दुकानदारांकडून घ्यावीत. याबाबत शेतकऱ्यांना काही शंका असल्यास त्यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन बुधवंत यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com