FPC Mahaparishad : अन्नदात्याने ऊर्जादाते व्हावे

राज्यातील पहिली ‘अॅग्रोवन शेतकरी उत्पादक कंपनी महापरिषद’ (एफपीसी लीडरशिप कॉन्क्लेव्ह) शुक्रवारी (ता. २) अतिशय थाटात पुण्यात पार पडली. या परिषदेचे उद्‌घाटन करताना श्री. गडकरी बोलत होते.
FPC Mahaparishad
FPC MahaparishadAgrowon

पुणे ः सोळा लाख कोटींचे इंधन आयात (Crude Oil Import) करणाऱ्या या देशातील अन्नदात्या शेतकऱ्यांनी आता ऊर्जादाते व्हावे. शेतकरी उत्पादक कंपन्यांसह (Farmer Producer Company) शेती क्षेत्राने संघटितपणे जैवइंधन उत्पादन (Bio Fuel Production) केल्यास किमान पाच लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांकडे जातीलच; पण देशाचा कृषी विकासदर (Agriculture Growth Rate) २० टक्क्यांपर्यंत जाईल, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी (NItin Gadkari) यांनी केले.

राज्यातील पहिली ‘अॅग्रोवन शेतकरी उत्पादक कंपनी महापरिषद’ (एफपीसी लीडरशिप कॉन्क्लेव्ह) शुक्रवारी (ता. २) अतिशय थाटात पुण्यात पार पडली. या परिषदेचे उद्‌घाटन करताना श्री. गडकरी बोलत होते. व्यासपीठावर इस्राईल केमिकल्स लिमिटेडचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुलकर्णी, ‘पारादीप फॉस्फेट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षदीप सिंग, ‘अॅग्रोवन’चे संपादक- संचालक आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार उपस्थित होते.

FPC Mahaparishad
FPC Movement : ‘एफपीसीं’ची चळवळ आता उड्डाणावस्थेत

राज्यभरातील निवडक निमंत्रित शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी अमाप उत्साहात या उपक्रमात सहभागी झाले होते. पारादीप फॉस्फेट्स लिमिटेड हे या उपक्रमाचे टायटल स्पॉन्सरर, तर पॉवर्ड बाय म्हणून इस्राईल केमिकल्स लिमिटेड सहभागी होते. तसेच वर्डेशियन, बँक ऑफ महाराष्ट्र, स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेड, फिनोलेक्स प्लासॉन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि राष्ट्रीय केमिकल्स अॅड फर्टिलायझर्स लिमिटेड हे सहप्रायोजक होते.

श्री. गडकरी यांनी अभ्यासपूर्ण भाषणातून उपस्थित एफपीसींच्या प्रतिनिधींना भरपूर ऊर्जा दिली. ते म्हणाले, ‘‘देशभर एफपीसींचा विस्तार होतो आहे; पण सर्वांत चांगले काम महाराष्ट्रात चालू आहे. आता पारंपरिक शेतीच्या चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करा. आधुनिक युगात ज्ञान व माहिती हेच शेतकऱ्यांच्या समृद्धीचे मुख्य आधार असतील. ‘अॅग्रोवन’च्या माध्यमातून दोन्ही आधार तुमच्यापर्यंत आणले जात आहेत. त्याचा उपयोग नफ्यात करून घ्या. प्रगतीचा हाच मंत्र बी. बी. ठोंबरे, विलास शिंदे यांनी समूहशेतीत जपला आहे. शेतीतील चांगुलपणावर कोणाचेही पेटंट नाही. त्यामुळे जगभर जेथे चांगले चालू आहे त्याचे अनुकरण शेतकऱ्यांनी करावे.’’

FPC Mahaparishad
FPC Movement : ‘एफपीसीं’ची चळवळ आता उड्डाणावस्थेत

टाकाऊ पदार्थांपासून समृद्धी (वेस्ट टू वेल्थ) हा शेतकऱ्यांच्या समृद्धीचा दुसरा मंत्र असेल, असे सांगत श्री. गडकरी यांनी, उद्याचा भारतीय शेतकरी ऊर्जादाता असेल, असे स्पष्ट केले. ‘‘ऊर्जानिर्मितीत सर्वाधिक संधी शेतकऱ्यांना राहतील. स्मार्ट व्हिलेजदेखील तयार करता येतील. साखर कारखान्यांना आता बायोसीएनजी सहज तयार करून विकता येईल. त्यावर ट्रॅक्टर चालविल्यास वर्षाकाठी एक लाखाची इंधन बचत होईल. सेंद्रिय टाकाऊ पदार्थांपासून, पाण्यापासून हरित हायड्रोजन तयार होऊ शकतो. शेतकऱ्यांना ऊर्जादाता बनविण्याची ब्ल्यू प्रिंट आता एफपीसींनी तयार करावी,’’ असे आवाहन त्यांनी केले.

‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक श्री. चव्हाण यांनी, देशात सुरू असलेल्या एफपीसी चळवळीचा पाया घालण्याचे काम महाराष्ट्र करीत असून, त्यात अॅग्रोवनचा खारीचा वाटा आहे. देशातील २० हजारांपैकी पाच हजार एफपीसी आपल्या राज्यात आहेत. त्यातील अनेक कागदावर असल्या, तरी चांगल्या एफपीसींना बळ देणारा उपक्रम अॅग्रोवन राबवतो आहे, असे आपल्या प्रास्ताविकात सांगितले. तर ‘‘सकारात्मक माहिती पुरवून शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल करणारे अॅग्रोवन हे जगातील एकमेव दैनिक आहे. सहकार आणि कॉर्पोरेट यांच्यातील उत्तम बाबींचा मेळ घालून एफपीसींची चळवळ व्यापक करण्याचा प्रयत्न आता अॅग्रोवनच्या महापरिषदेतून होतो आहे,’’ असे ‘सकाळ’चे संपादक संचालक श्री. पवार यांनी नमूद केले.

‘स्वप्न साकारण्यासाठी अॅग्रोवन तुमच्यासोबत’

‘‘एफपीसींनी आता स्वतःची संकेतस्थळे उघडावीत. माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आपल्या शेतीमालाची उत्पादकता वाढवावी. मूल्यसाखळीवर काम करून निर्यातीच्या माध्यमातून डॉलरमध्ये व्यवहार करावेत. त्यामुळे गावात रोजगार तयार होईल. यातून देशाचा विकासदर वाढेल. स्थलांतर थांबेल आणि हे स्वप्न तुमच्या प्रयत्नांमधून साकारल्यास शेतकरी पुन्हा समृद्ध होतील. त्यासाठी सकाळ अॅग्रोवन तुमच्या सोबत आहे,’’ असे गौरवपूर्ण उद्‌गार श्री. गडकरी यांनी काढले. या वेळी उपस्थित एफपीसी प्रतिनिधींनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.

गडकरी यांनी ‘एफपीसीं’ना काय टिप्स दिल्या?

शेतकऱ्यांना ऊर्जादाता करण्याची ब्ल्यू प्रिंट एफपीसींनी तयार करावी.

टाकाऊ सेंद्रिय पदार्थांपासून इंधननिर्मितीकडे वळावे.

स्मार्ट व्हिलेज तयार करण्यासाठी पुढाकार घ्या.

प्रत्येक गावात एक उत्तम रोपवाटिका तयार करा.

प्रत्येक प्रकल्पात गुणवत्ता अग्रस्थानी ठेवा.

उत्पादन, साठवण, प्रक्रिया, ब्रॅंडिंग, निर्यात अशा पूर्ण साखळीवर कामे करा.

स्वतःची संकेतस्थळे सुरू करून माहितीचे आदानप्रदान करा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com