शेतकऱ्यांनी बियाण्यांवरील खर्च कमी करावा: बच्चु कडू

शेतकऱ्यांनी उगवण क्षमतेची खात्रीशीररीत्या तपासणी केलेले घरचे बियाणे वापरावे.
शेतकऱ्यांनी बियाण्यांवरील खर्च कमी करावा: बच्चु कडू
Bachhu KaduAgrowon

अमरावती : ‘‘शेतकऱ्यांनी उगवण क्षमतेची (Germination) खात्रीशीररीत्या तपासणी केलेले घरचे बियाणे (Seed) वापरावे. बियाणे महोत्सवाच्या (Seed Festival) माध्यमातून एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना खात्रीशीर व उत्कृष्ट उगवणक्षमता असलेले बियाणे मिळेल. शासन खंबीररीत्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे,’’ असे प्रतिपादन राज्यमंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केले.

चांदूर बाजार येथील प्रहार कार्यालयाच्या प्रांगणात बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, चांदुर बाजारच्या तालुका कृषी अधिकारी फाल्गुनी ननीर, अचलपूरच्या तालुका कृषी अधिकारी स्नेहल ढेंबरे उपस्थित होत्या.

कडू म्हणाले, ‘‘जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बियाणे घरीच तयार करावे. याबाबत शास्त्रीय पद्धतीने बियाणे तयार करण्याच्या प्रक्रियेचे प्रशिक्षण घेतले जाईल. शेतकऱ्यांनी उत्कृष्ट उगवणक्षमता असलेले बियाणे घरी तयार करण्याची चळवळ राबवावी. बीज उत्पादक शेतकऱ्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येतील.’’

दरम्यान, शेतकऱ्यांना घरचे बियाणे विक्री करण्यासाठी त्यांच्या जवळील ट्रेमध्ये उगवणक्षम बियाण्यांची माहिती देण्यासाठी व तपासणी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या ‘ट्रे’मध्ये विविध पिकांच्या बियाण्यांच्या उगवणीबाबत माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

महोत्सवाचे वैशिष्ट्य

बियाणे महोत्सवात वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ बियाणे विक्रीसाठी सहभागी झाले होते. ज्या शेतकऱ्यांकडे बियाणे नाही, त्यांच्यासाठी घरचे उत्पादित केलेले दर्जेदार बियाणे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, कांदा, भुईमूग, भाजीपाला व इतर बियाणे वाजवी दरात उपलब्ध केली होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com