...अन्यथा कृषी केंद्राच्या गोदामांची झाडाझडती घेणार

सध्या पूरपरिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आहे. कृषी सेवा केंद्र चालकांनी घेतलेल्या भूमिकेचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्रास होत आहे.
Warehouse
Warehouse Agrowon

अकोला : जिल्ह्यात सध्या पूरपरिस्थितीमुळे (Flood Condition) शेतकरी अडचणीत आहे. कृषी सेवा केंद्र चालकांनी घेतलेल्या भूमिकेचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्रास होत आहे. शेतकऱ्यांना नाहक त्रास दिल्यास शेतकरी संघटना संबंधितांच्या गोदामांची (Warehouse) झाडाझडती घेऊन प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे (Shetkari Sanghatana) जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी दिला.

Warehouse
मराठवाडा विभाग कृषी सल्ला (कापूस. रब्बी ज्वारी, तूर, गहू, केळी, पालेभाज्या पिके)

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. २१) सायंकाळी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात धडक दिली. कृषी सेवा केंद्रचालक संघटनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास देत असल्याच्या अनुषंगाने शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा अधीक्षकांसोबत चर्चा केली.

श्री. कौठकर यांच्यासह या वेळी महिला आघाडी प्रमुख प्रमिलाताई भारसाकळे, अडगाव शाखा प्रमुख मोहन खिरोडकर, सोपान इंगळे, गोपाल निमकर्डे, दिनेश गिर्हे, शेख इम्रान, संजू ढोकणे, रामकृष्ण थोटे, नदिमोद्दीन, शेख इस्माईल, आदित्य माळगे, अशोक बागडे, अमीर अली, श्रीकृष्ण पागृत यांच्यासह इतर उपस्थित होते.

कृषी अधीक्षकांचा सन्मान

जिल्ह्यात धडकपणे कारवाई करणारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून या वेळी शेतकरी संघटनेने डॉ. खोत यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com