Land Record : जमीन कसणारे शेतकरी कागदोपत्री बेदखल

आटपाडी तालुक्यातील देवस्थान इनाम वर्ग-३ ची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे इतर हक्कमध्ये टाकून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला असून ती पूर्ववत करण्यासाठी वारंवार आंदोलने उपोषण झाले.
Agriculture
Agriculture

दिघंची, जि. सांगली ः आटपाडी तालुक्यातील देवस्थान इनाम वर्ग-३ ची जमीन (Agriculture Land) कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे इतर हक्कमध्ये टाकून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला असून ती पूर्ववत करण्यासाठी वारंवार आंदोलने उपोषण (Agitation) झाले. मात्र, कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने आता जनावरे, शेळ्या-मेंढ्यांसह तहसीलदार कार्यालयासमोर कार्यवाही होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा लेखी निवेदनाद्वारे तहसील कार्यालय व आटपाडी पोलिस स्टेशला अखिल भारतीय किसान सभेचे (Bhartiya Kisan Sabha) धनाजी पवार व हैदर मुजावर यांनी उन्मेष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिला आहे.

Agriculture
Land Record : शेतकऱ्यांच्या ‘सात-बारा’वरील नोंदीबाबत तोडगा नाहीच

निवेदनात नमूद केले आहे, की अनेक वर्षे या तालुक्यातील शेतकरी इनाम वर्ग तीनची जमीन कसतो आहे. जमिनी मोठ्या मेहनतीने दुरुस्ती करून पिके घेत आहे. मात्र, शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्याचे सोडाच पण भोगवाट धारकांची नावे कमी करून इतर हक्कात समाविष्ट केली आहेत. इतर हक्कातील शेतकरी मयत झाल्यास त्याच्या वारसांची नावे समाविष्ट होत नाहीत. पर्यायाने त्या शेतकऱ्यांचे नाव त्या सातबारामधून कमी होणार आहे.

Agriculture
Land Record : सातबारा, मिळकत पत्रिकांवर आता ‘यूएलपीन’ बंधनकारक

सध्या इनाम तीन मधील शेतकऱ्यांनी पिढ्यानपिढ्या कष्ट करून विकसित केली. सध्या या जमिनी भोगवटा करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणतीही बँक सोसायटीच्या माध्यमातून शेती अथवा कोणत्याही प्रकारची कर्जे मिळत नाहीत. तरीही शेतकरी पिके घेत आहेत. याबाबत प्रांताधिकारी याचबरोबर सुद्धा चर्चा झाली आहे व तसा त्यांनी इतर हक्कातील नवे भोगवटधारक म्हणून लावण्याचे लेखी पत्र काढले आहे. मात्र येथील तहसीलदार उद्धट उत्तरे देऊन टाळाटाळ करीत आहेत.

इनाम जमिनीचा हा विषय २०१० पासून प्रलंबित आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी तत्कालीन मंत्री आर. आर. पाटील, पतंगराव कदम, जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून दुरुस्ती करून घेतली. मात्र आटपाडी तालुक्यातील विषय प्रलंबित असून याकडे आमदार व खासदार यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.

- केशवराव मिसाळ, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com