Chana Seed : शेतकऱ्यांना अनुदानित दरात ‘महाबीज’चे हरभरा बियाणे

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व ग्रामबीजोत्पादन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी महाबीजचे हरभरा बियाणे अनुदानित दरात मिळणार आहे.
Chana Market Rate
Chana Market RateAgrowon

कोल्हापूर/सांगली : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (National Food Security Mission) व ग्रामबीजोत्पादन योजनेअंतर्गत (Seed Production) शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी महाबीजचे हरभरा बियाणे (Mahabeej Chana Seed) अनुदानित दरात (Seed On Subsidize Rate) मिळणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाबीजचे कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक एन. जी. इनामदार यांनी केले.

Chana Market Rate
Kabuli Chana : काबुली हरभरा तेजीत

सोयाबीन व भात कापणी, मळणीला सुरुवात झाल्याने रब्बी हंगामाची लगबग दिसून येत आहे. त्या अनुषंगाने शासनातर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व ग्रामबीजोत्पादन योजना जिल्ह्यात कृषी विभागातर्फे राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेमध्ये जिल्ह्याला ४२८ क्विंटल बियाणे वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे.

Chana Market Rate
Chana Cultivation : हरभरा लागवडीचे सुधारित तंत्र

या योजनेअंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परवानावाटप होणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत हरभरा (दहा वर्षांआतील वाण) ४५ रुपये प्रति किलो या अनुदानित दराप्रमाणे तर ग्रामबीजोत्पादन योजनेअंतर्गत हरभरा (दहा वर्षांआतील वाण) ४५ रुपये प्रति किलो व दहा वर्षांवरील वाण ५२ रुपये प्रति किलो या अनुदानित दराप्रमाणे महाबीजच्या वितरकांकडे उपलब्ध होणार आहे.

या योजनेअंतर्गत दहा वर्षांआतील हरभरा फुले विक्रम, राजविजय -२०२, एकेजी-११०९, बी जी एम-१०२१६ व दहा वर्षांवरील विजय, दिग्विजय, विशाल व जॅकी-९२२८ ही वाण उपलब्ध होणार आहेत.

हरभरा दहा वर्षांआतील वाणाची मूळ किंमत ७० रुपये प्रति किलो आहे. यामध्ये अनुदान २५ रुपये प्रति किलो असून अनुदानित दर ४५ रुपये प्रति किलो आहे. हरभरा दहा वर्षांवरील वाणाची मूळ किंमत ७२ रुपये प्रति किलो आहे. यात अनुदान २० रुपये प्रति किलो असून अनुदानित दर ५२ रुपये प्रति किलो आहे.

या योजनेत शेतकऱ्याला सात-बारा, आधारकार्ड घेऊन बॅग वितरित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. इनामदार यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com