Fish Farming : शेतकऱ्यांना मिळणार पशू, मत्सपालनाचे डिजिटल धडे

डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता त्याद्वारे शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पशूपालन व मत्स्य शिक्षण व अचूक तांत्रिक माहिती देण्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (माफसू) व ॲडराईज इंडिया यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
Digital Fish Farming
Digital Fish FarmingAgrowon

नागपूर : डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता त्याद्वारे शेतकऱ्यांना (Farmer) शास्त्रोक्त पशूपालन व मत्स्य शिक्षण व अचूक तांत्रिक माहिती देण्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (माफसू) व ॲडराईज इंडिया यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

Digital Fish Farming
Crop Damage Survey : ‘पंचनामे राहिलेल्या शेतकऱ्यांनो संपर्क साधा’

वंदे किसान ॲपवर लवकरच मत्स्य, पशुपालन संदर्भात विविध कोर्सेस उपलब्ध होत असून, देशभरातील जनावरांना भेडसावणाऱ्या ‘लम्पी स्कीन’ सारख्या विषयावर देखील प्रबोधन करण्यात येईल. या कार्यक्रमाला ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी, विद्यापीठाचे प्रा. डॉ. अनिल भिकाने (संचालक, विस्तार शिक्षण), प्रा. डॉ. शिरीष उपाध्ये, (संचालक शिक्षण), प्रा. डॉ. नितीन कुरकुरे (संचालक संशोधन), प्रा. डॉ. सुनील सहातपुरे (अधिष्ठाता, निम्न शिक्षण), प्रा. डॉ. प्रशांत वासनिक (अधिष्ठाता, दुग्ध तंत्रज्ञान), प्रा. डॉ. सचिन बोंडे (अधिष्ठाता, मत्स्य विज्ञान), डॉ. सारीपुत लांडगे (तांत्रिक अधिकारी, विस्तार संचालनालय) व ॲडराइज इंडियाचे प्रसाद कुलकर्णी, अनिरुद्ध हजारे उपस्थित होते.

शेतकऱ्यांना मोबाईलच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने शास्त्रोक्त व अधिकृत शिक्षण देणे ही काळाची गरज असून, त्यासाठी ‘माफसू’ विद्यापीठ कायमच अग्रेसर असल्याचे प्रतिपादन कुलगुरू कर्नल प्रा. आशीष पातुरकर यांनी या वेळी बोलताना केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com