Indian Agriculture : शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील

शेतीसाठी सध्या वाईट दिवस आहेत. मात्र जे शेतकरी दुग्धपालन, शेळीपालनासारखे पूरक व्यवसाय करतात, ते संकटातही तारले जात आहेत.
Nivrutii Maharaj Indorikar
Nivrutii Maharaj IndorikarAgrowon

Ahmednagar News : ‘‘शेतीसाठी सध्या वाईट दिवस आहेत. मात्र जे शेतकरी दुग्धपालन (Dairy Business), शेळीपालनासारखे (Goat Farming) पूरक व्यवसाय करतात, ते संकटातही तारले जात आहेत. त्यामुळे शेतीसोबत पूरक व्यवसाय वाढला तरच शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील.

आरोग्य आबाधित ठेवायचे असेल तर सेंद्रिय उत्पादन आवश्यक असून, त्यासाठी पशुधन दारात असणे गरजेचे आहे,’’ असा आत्मविश्वास प्रसिद्ध प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर (Nivrutti Maharaj Indorikar) यांना व्यक्त केला.

शिर्डी येथील राज्यस्तरीय पशुप्रदर्शनात निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे रविवारी (ता.२६) शेतकऱ्यांसाठी प्रबोधनपर कीर्तन झाले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. इंदोरीकर म्हणाले, ‘‘जुन्या काळात दोन का होईना शेळ्या शेतकऱ्यांच्या दारात असतं. शेळी म्हणजे शेतकऱ्यांचे ‘एटीएम’ आहे.

कितीही संकट येऊ द्या, जे शेतकरी पूरक व्यवसाय करतात, त्यांनी संकटावर मात केल्याची अनेक उदाहरणे आहेत. नगर जिल्‍ह्यासह राज्यातील अनेक भागांत दूध, शेळीपालनासांरख्या पूरक व्यवसायावर शेतकरी कुटुंबे तरली आहेत.

शेती परवडली नाही तर शेतकरी नैराश्यात जातात, नैराश्य टाळायचे असेल तर पशुधनच शेतकऱ्यांना जगवू शकतं. शेती कमी असली तरी चालेल, पण दारात दोन गाई असल्या तर तो शेतकरी सुखी होईल. पूरक व्यवसायासाठी सरकारनेही शेतकऱ्यांना पाठबळ दिले पाहिजे.’’

Nivrutii Maharaj Indorikar
Indian Agriculture : शेतजमिनीचा ताबा, वहिवाटीबाबत वाद मिटणार

शेतीतील अन्नधान्य, भाजीपाला केमिकलयुक्त तयार होत आहे. त्यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे. यापासून बचाव करायचा असेल तर सेंद्रिय शेती झाली पाहिजे.

त्यासाठी शेणखताचा वापर गरजेचा आहे. दारात पशुधन असल्याशिवाय तुमची शेती सेंद्रिय होणार नाही. सेंद्रिय शेती केली तर उत्पादन खर्च कमी होईल, शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि खाणाऱ्यांचे आयुष्य वाढेल.

Nivrutii Maharaj Indorikar
Indian Agriculture : मोदी सरकारच्या काळात शेतीची मोठी उपेक्षा

शेतकऱ्यांनी परवडणारी शेती करावी. पाणी परीक्षण, माती परीक्षण करावे. आता पारंपरिक शेतीऐवजी तंत्रज्ञानाच्या वापरातून शेती करणे गरजेचे आहे.

शेती तोट्यात जाण्याची कारणे शोधावी लागतील आणि जे विकेल तेच पिकवावे लागेल. कांद्याला एकरी ८० हजारांपेक्षा अधिक खर्च येतो, आणि जर तीन रुपये किलोने कांदा विकावा लागत असेल तर शेतकरी कसा सुधारणार?’’

‘खर्च कमी करा’

निवृत्ती महाराज देशमुख म्हणाले, ‘‘ग्रामीण भागात लग्नासह विविध कार्यक्रमांतून मोठा खर्च केला जातो. प्रतिष्‍ठा जपण्यासाठी हे सर्व सुरू आहे, मात्र यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. लग्नसोहळा व अन्य कार्यक्रमांवरील खर्च कमी करा, तर शेतकरी नक्कीच सुखी होईल.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com