PDCC Bank
PDCC BankAgrowon

Farmer Training : पुणे जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना मिळणार प्रशिक्षण

प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ३० शेतकरी सभासदांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना हे प्रशिक्षण मोफत मिळणार असून, शेतकऱ्यांना फक्त प्रवासाचा खर्च करावा लागणार आहे.

पुणे : जलद आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोन ठेवून कृषी व कृषिपूरक व्यवसायाची (Agri Based Business) उत्पादकता वाढविण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी)वतीने सभासद शेतकऱ्यांना कृषी व कृषिपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण (Farmer Training) घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

PDCC Bank
PDCC Bank : पीडीसीसी’ बॅंकेत महिला बचत गटांच्या वस्तूचे प्रदर्शन

त्यासाठी बँकेने १७० प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन केले असून, पुढील तीन वर्षांमध्ये हे प्रशिक्षण अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंन्ट ट्रस्टच्या बारामती कृषी विज्ञान केंद्र येथे दिले जाणार आहे. प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ३० शेतकरी सभासदांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना हे प्रशिक्षण मोफत मिळणार असून, शेतकऱ्यांना फक्त प्रवासाचा खर्च करावा लागणार आहे.

PDCC Bank
PDCC Bank Pune : ‘पीडीसीसी’ बँकेला ६८ कोटींचा नफा

त्यातील पहिल्या प्रशिक्षणाची सुरुवात आजपासून (ता.५) होणार आहे. मधमाशीपालन या विषयावर पहिले प्रशिक्षण शनिवारपर्यंत असणार आहे. पुढील प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन प्रत्येक महिन्याच्या २० तारखेपर्यंत शेतकरी सभासदांसाठी बँकेच्या संकेतस्थळावर व संबंधित तालुका स्तरावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

त्यानुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संबंधित तालुक्यातील विभागीय कार्यालयात याबाबत आपले नाव नोंदणी करून या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवण्यात यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केले.

या विषयावर मिळणार प्रशिक्षण...

- मधमाशीपालन

- रेशीम उद्योग

- कुक्कुटपालन

- मेंढी व बकरी व्यवस्थापन

- दूध व दुग्धजन्य उत्पादनाचे मूल्यवर्धन

- शहरी शेती स्वयंपाकघर व टेरेस बागकाम

- सेंद्रिय शेती

- ग्रीनहाऊस व शेडनेट घर

- फळे व भाजीपाल्याचे मूल्यवर्धन

- फळे भाजीपाला प्रक्रिया

- दुधाळ जनावरांची काळजी

- भाजीपाला पिकांचे नर्सरी व्यवस्थापन

- तळ्यातील मत्स्यशेती

- गिफ्ट तिलापिया मत्स्यपालन व्यवस्थापन

- प्रगतिशील शेती व्यवस्थापन

- आधुनिक पद्धतीने फलोत्पादन

- विपणन व मूल्यसाखळी विकास पोस्ट हार्वेस्ट तंत्रज्ञान

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com